निवडणुकित सोशल मिडिया वापरकर्त्यांचाच विजय

शिरुर, ता.४ मार्च २०१७ (सतीश केदारी) : नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकित सोशल मिडिया वापरणा-या उमेदवारांचाच विजय झाला असल्याचे निदर्शनास अाले अाहे.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समिती च्या चौदा जागांसाठी निवडणुक लढवली गेली.निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबरच उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली. अनेकांनी थेट गाठी भेटी घेतल्या तर काहींनी तेव्हांपासुनच सोशल मिडियाचा अाधार घेण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्यांना अाकर्षित करण्यासाठी व जलद प्रचार करण्यासाठी सोशल मिडियावरील फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातुन प्रभावी प्रचार करण्याचा अनेकांनी फंडा वापरला.या निवडणुकित ज्या-ज्या पक्षांनी सोशल मिडियाचा अाधार घेतला त्यांचेच उमेदवार मोठ्या प्रमाणावर  निवडून अाले आहेत. अद्यापही ज्यांना सोशल मिडियाचे महत्त्वच कळाले नाही ते  माञ सामान्यांपासुन अक्षरश: दुर फेकले गेल्याचे दिसते. दिवसेंदिवस सर्वञ अॉनलाईनचा प्रसार वाढतच चालला असुन अागामी काळात देखिल अॉनलाईन पासुन दुर राहणा-यांना त्याचा फटका माञ निश्चित जाणवणार अाहे.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या