रांजणगांवला भव्य कृषी प्रदर्शन अन खरेदी महोत्सव

रांजणगांव गणपती, ता.४ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : येथे(ता.९ मार्च ते १३ मार्च) दरम्यान भव्य कृषी प्रदर्शन भरवले जाणार असुन खाद्य जञा अन खरेदी महोत्सवाचे अायोजन  केले असल्याचे सचिन तोडकर यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, बि-बियाणे,कृषी प्रक्रिया उद्योग,अत्याधुनिक शेतीशी निगडीत यंञसामग्री,घरगुती ते अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे,कृषी योजना तसेच बॅंकांचा पतपुरवठा,दुचाकी व चारचाकी वाहने,महिला बचत गटांचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, इतरही १५० नावीनपुर्ण वस्तुंचे स्टॉल्स उभारले जाणार सर्वच प्रकारची माहिती शेतक-यांना या प्रदर्शनात पहायला मिळणार अाहे.

शिरुर तालुक्यात प्रथमच भव्य मोठया प्रमाणावर होत असलेल्या या प्रदर्शनात जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग घ्यावा असेही त्यांनी बोलताना सांगितले.स्टॉल साठी संपर्क : ९६०४४३४४४४

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या