मलठण ला दिशादर्शक फलक झाडांत गायब

कवठे येमाई, ता.४ मार्च २०१७(प्रा.सुभाष शेटे) :  शिरूर-मंचर-राजगुरूनगर रस्त्यावर मलठणच्या  राजवाड्याजवळ रस्ते विभागाने लावलेला दिशादर्शक व गावांचे  अंतर दर्शविणारा मोठा फलक सध्या झुडपांच्या आड लपलेला सर्वांना पाहावयास मिळतो अाहे.

कवठे येमाई ,मलठण  मार्गे शिरूर,शिक्रापूर,कान्हूर मेसाई कडे जाणा-या नवीन वाहनचालकांना हा फलक अत्यंत महत्वाचा असून रस्ते विभागाने येथील वाढलेली झाडे झुडपे काढून तो वाहनचालकांना दिसेल अशी या परिसराची स्वच्छता करण्याची गरज कवठे येमाईचे उपसरपंच अरुण मुंजाळ ,सामाजिक कार्यकर्ते शरद उघडे व वाहन चालक प्रवाशामधून व्यक्त केली जात आहे.

मंचर -मलठण-शिरूर मार्गावरून अष्टविनायक दर्शनासाठी जाणारी वाहने व स्थानिक व  विविध भागातून या मार्गावरून जाणारी नवीन  वाहने यांना मलठण राजवाड्या मागे रस्त्यालगत असलेला हा दिशा दर्शक फलक अत्यंत उपयुक्त असून सध्या हा फलकच झुडपांच्या आड दडल्याने व त्यावरील अंतर दाखवविणारे आकडे ही पुसट झाल्याने  नवीन वाहनचालकांची होणारी होणारी अडचण लक्षात घेत सार्वजनिक रस्ते विभागाने तातडीने या फलका समोरील व परिसरातील झाडे झुडपे काढून या दिशा दर्शक फलकास नवीन झळाळी देण्याची गरज प्रवाशी,वाहनचालकांमधून  केली जात आहे .

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या