जागतिक महिलादिनानिमित्त हाडांची तपासणी शिबिर

रांजणगांव गणपती, ता.६ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : येथील श्री.गजानन हॉस्पिटल च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त हाडांची तपासणी शिबिराचे अायोजन केले असल्याची माहिती डॉ.अंकुश लवांडे यांनी दिली.

या विषयी अधिक माहिती देताना डॉ.अंकुश लवांडे यांनी सांगितले कि,दैनंदिन कामाच्या वेळांत सर्वच महिलांचे अारोग्याकडे दुर्लक्ष होते.त्याचप्रमाणे रांजणगांव व परिसरात अौद्योगिकरणामुळे अनेकांची दैनंदिन जीवनशैली बदलत चालली असुन त्याचा परिणाम पु्रुषांसह महिलांच्या अारोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत  असल्याचे प्रकर्षाने दिसते.महिलांचे माञ अारोग्यावर दुर्लक्ष झाल्याने अॅनिमिया,हाडांचा ठिसुळपणा अादी अाजार बळावत असल्याचे दिसते.त्यामुळेच जागतिक महिलादिनाचे अौचित्य साधुन हाडांचे तपासनी शिबिर अायोजित केले असुन परिसरातील अधिकाधिक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे  अावाहन देखिल गजानन हॉस्पिटल चे डॉ.अंकुश लवांडे यांनी केले अाहे.

दवाखाना ठरतोय रुग्णांना वरदान
रांजणगांव गणपती परिसरातील श्री.गजानन हॉस्पिटल येथे गरीब व गरजु रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकिय  सुविधा उपलब्ध होत अाहेत.त्याचप्रमाणे या ठिकाणी डिजीटल एक्स-रे,रक्त तपासणी,मधुमेह तपासणी, तातडीच्या वैद्यकिय सुविधा,सुसज्ज अॉपरेशन थिएटर, अादी सुविधांनी सुसज्ज दवाखाना  असल्याने गरीब रुग्णांना हा दवाखाना वरदान ठरत अाहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : ९३७१०४२७९२

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या