टाकळी भिमाची चार दिवसांपासुन 'बत्ती गुल'

टाकळी भिमा,ता.६ मार्च २०१७ (जालिंदर अादक) : टाकळी भिमा गावातील होमाचीवाडी येथील विद्युत रोहित्रे चार दिवसापूर्वी जळाले असल्याने चार दिवसांपासुन येथील बत्ती गुल असुन  नागरिक  संतप्त झाले अाहेत.

टाकळी भिमा येथील होमाचीवाडी येथील विद्युत रोहित्रे चार दिवसापूर्वी जळाले असून अद्याप ते नादुरुस्त अवस्थेत पडले असून येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत अाहे.नागरिकांचे मोठ्या प्रमानावर हात होत असले तरी  वीजवितरण अधिकारी असल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नसल्याचे चित्र दिसत असून नागरिक व शेतकरी हवाईदिल झाले आहेत.

याच विद्युत रोहित्रावरून होमाचीवाडी, पाचर्णेवस्ती, येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे तसेच शेतीला जोडधंदा करू पाहणारा दुग्धव्यवसाय अडचणीत येत आहे. दुभत्या जनावरांना पाण्याची सोय नसल्याने त्यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. तसेच याच विद्युत रोहित्रावरून शेतातील पिकांना शेतकरी पाणी देण्यासाठी वापर करत आहे.परंतु ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात पिकांना पाणी कमी पडल्यास त्याचा फटका शेतकर्यांना सहन करावा लागणार आहे.

टाकळी भिमा गाव हे भिमा नदी किनारी असल्यामुळे सर्वच भाग बागायती आहे. विद्युत मोटारीने शेतात पाणी आणले जाते व पिकांना दिले जाते. मागील काही दिवसापासून नदीकडेच्या दोन विद्युत रोहित्रे चोरीला गेले असून अद्यापही त्याचा काही तपास लागला नाही मात्र याठिकाणी विद्युत रोहित्रे चोरीला जाण्याचे प्रकार जास्तच असून त्यावर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे. यातून शेतकऱ्यांच्या घरावर संक्रात बरसली आहे उभी पिके जळू लागली आहे या प्रश्नाकडे कोणी जातीने लक्ष देईल का? असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या