पराभुत उमेदवारांकडुन'त्या' कार्यकर्त्यांना शिव्याच

शिरुर,ता.६ मार्च २०१७ (प्रतिनीधी) : नुकत्याच झालेल्या निवडणुकित जय-पराजय यांच्या गांवपारावर चांगल्याच चर्चा रंगत असुन ठिकठिकानी गप्पांना उधान अाले अाहे.

शिरुर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायतीसाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया पार पडली.जिल्हा परिषदेच्या सात व पंचायत समितीच्या चौदा  जागांसाठी लढवलेल्या निवडणुकित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले तर दुसरीकडे  इतर पक्षांतील अनेकांना देखिल पराभव पत्कारावा लागला.त्याचप्रमाणे काहि ठिकानी अपक्ष देखिल निवडणुन अाले असुन शिवसेनेही जागा मिळवत सत्तेत वाटेकरी असल्याचे दाखवुन दिले.

शिरुर तालुक्यात निवडनुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर अनेकांनी निवडणुकिची जोरदार तयारी केली होती.त्यानुसार भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात अाले.विविध प्रकारे मतदारांना अापलेसे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च देखिल करण्यात अाला. निवडणुकिचे तिकिट झाल्यानंतर ते त्या पुर्वी मोठ्या प्रमाणावर खर्च होउनही हार न मानता  अनेक उमेदवारांनी जिंकण्याच्या उमेदीने तयारी सुरुच ठेवली होती. निवडणुकित पैशाचे वाटप सुयोग्य रितीने व्हावे म्हणुन तशी व्युहरचना अाखत कार्यकर्त्यांकडे पैशाचे वाटप करण्यात अाले.परंतु पैशाची देखिल चाळण होत गेली अन अखेर त्या-त्या भागात उमेदवार पडले गेले.अाता सर्वच पक्षांकडुन पराभवाची कारणमिमांसा केली जात असुन असे पराभवाचे खापर सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फोडले जात अाहे.त्याच प्रमाणे  पराभुत उमेदवारांकडुन कार्यकर्त्यांना शिव्याच घातल्या जात असल्याच्या चर्चा गांवपारावर ठिकठिकाणी रंगु लागल्या अाहेत.

निवडणुकीत काही ठिकाणी मतांची चुकलेली गणिते,पैसे वाटपात झालेला घोळ, केलेले पक्षकाम अादींची समीकरणे सर्वच पक्षांकडुन होत असुन चुकिची कामे केलेल्यांना शिव्या तर चांगली कामे केलेल्या कार्यकत्याला पाठ थोपटण्याचा कार्यक्रम सुरु असल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांच्या कानोकानी ऐकायला मिळु लागल्या अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या