संभाजीराजे विद्यालयास रोटरीकडुन सॅनिटरी नॅपकिन मशीन

जातेगाव बुद्रुक,ता.८ मार्च २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील संभाजीराजे विद्यालयास रोटरी क्लबच्या वतीने सुमारे 2 लाख 70 हजाराचे जलशुध्दीकरण प्रकल्प व सॅनिटरी नॅपकीन मशिन देण्यात आले.

रोटरी क्लब पुणे वेस्ट, शिक्रापूर व राजगुरूनगर शाखेच्या वतीने नुकताच संभाजीराजे विद्यालयास जलशुध्दीकरण प्रकल्प व सॅनिटरी नॅपकीन मशिन प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुगंधराव उमाप होते.

या कार्यक्रमात नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुभाष उमाप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी घोडगंगा साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष प्रकाश पवार, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल विरधवल करंजे, राजगुरूनगर रोटरीचे अध्यक्ष अविनाश कोहीनकर, शिक्रापूर रोटरीचे अध्यक्ष लधाराम पटेल, मानद सचिव डॉ.मच्छिंद्र गायकवाड, मंगेश हांडे, प्राचार्य रामदास थिटे, अविनाश कहाणे, साहेबराव उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.रोटरी क्लबद्वारे विद्यालयात हॅपी स्कूल, इंटरअॅक्ट क्लब व रोटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी बोलताना डॉ.मच्छिंद्र गायकवाड यांनी सांगीतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले.प्रा.मनोहर भिसे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.शंकर भुजबळ यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या