शिरूर तालुक्यात दहावीच्या परिक्षेस 6 हजार 200 विद्यार्थी

शिरूर,ता.८ मार्च २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : तालुक्यात एस.एस.सी.बोर्ड परीक्षेसाठी 15 केंद्रातून 6 हजार 200 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर आज शांततेत व सुरळीत परीक्षेस सुरवात झाल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ यांनी दिली.

एस.एस.सी.परीक्षेसाठी शिरूर तालुक्यातील विविध केंद्र व या केंद्रामधून परीक्षेस बसलेले कंसातील विद्यार्थी पुढीलप्रमाणे :– शिरूर येथील विद्याधाम प्रशाला (502) न्यू इग्लिश स्कूल (451), न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालय (547), तळेगाव ढमढेरे येथील रायकुमार बी. गुजर प्रशाला (511), शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशाला (763), भैरवनाथ विद्यालय करडे (414), वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (335), छत्रपती विद्यालय वडगाव रासाई (289), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (316), सरदार आरळडीळ हायस्कूल केंदूर(125), संभाजीराजे विद्यालय जातेगाव(294), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भिमा(379), बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी(417), न्यू इंग्लिश स्कूल मलठण(509), भैरवनाथ विद्यालय पाबळ (348)आदी 15 केंद्रातून एस.एस.सी.बोर्ड परीक्षा होत असून शिरूर तालुक्यातील 6 हजार 200 विद्यार्थी या केंद्रातून परीक्षा देत आहेत.

बहुतांश परीक्षा केंद्रांच्या प्रवेशद्वारावर गुलाबपुष्प देवून ग्रामस्थ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. परीक्षा केंद्रात कोणताही अनुचित प्रकार होवू नये म्हणून विद्यार्थ्याची परीक्षा दालनात प्रवेश करताना पर्यवेक्षण पथकातील शिक्षकांद्वारे सर्व विद्यार्थ्याची कसुन तपासणी केली जात असल्याचे न्हावरे येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाचे केंद्र संचालक एफ.टी. वाजे यांनी सांगीतले. तर सर्वच परीक्षा केंद्रातून  सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणात मराठीच्या पेपरने परीक्षेस सुरवात झाली असून परीक्षा काळात विविध तपासणी पथके केंद्रांना आकस्मीक भेटी देवून केंद्रांची तपासणी करणार असल्याचेही गटशिक्षणाधिकारी मिसाळ यांनी सांगीतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या