विशेष मुलांच्या कलागुणांनी उपस्थित गेले भारावुन

शिरुर,ता.१० मार्च २०१७(सतीश केदारी) : शिरुर शहरातील अाकांक्षा संस्थेतील विशेष मुलांनी महिलादिनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित  चांगलेच भारावुन गेले होते.

शिरुर येथे अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशन या विशेष मतिमंद मुलांच्या संस्थेचा प्रथम वर्धापनदिन जागतिक महिलादिन साजरा करण्यात अाला.या निमित्त नगरपालिका कार्यालयात सामाजिक क्षेञात भरीव योगदान असणा-या सायली धनाबाई या युवा कार्यकर्तीचे व्याख्यान अायोजित करण्यात अाले होते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात अाले.अाकांक्षा फौंडेशन च्या संस्थापिका राणी चोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेचा खडतर प्रवास व अालेले अनुभव विशद केले तसेच भविष्यात शिरुर परिसरात निवासी प्रकल्प सुरु करणार असल्याचे सांगितले.

सामाजिक क्षेञात कार्य करणा-या सायली धनाबाई वेळी बोलताना म्हणाल्या कि, समाजात अाज महिला सर्वच क्षेञात अग्रेसर अाहेत.परंतु दुसरीकडे माञ मोठ्या प्रमाणावर घरगुती हिंसाचाराला देखिल मोठ्या प्रमाणावर महिला बळी पडत अाहेत.समाजातील महिलांवर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर महिलांनीच पुढाकर घ्यावा.तसेच शाळा,कॉलेज मध्ये मुलींना स्पर्श ज्ञानाबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

या वेळी डॉ.प्रेरणा बाफणा म्हणाल्या कि,अाकांक्षा एज्युकेशनल फौंडेशनचे विशेष मुलांसाठीचे कार्य कौतुकास्पद असुन समाजातील वंचित मुलांना ख-या अर्थाने अाशेचा किरण ठरत अाहे.समाजाने ही सामाजिक बांधिलकी जपत पुढे येउन अशा संस्थांना मदत करण्याचे अावाहन त्यांनी केले.

या प्रसंगी नगराध्यक्षा वैशाली वाखारे,पोलीस निरीक्षक दयानंद गावडे,जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार,पं.स सदस्य अाबा सरोदे,नितेश बनसोडे, मी विजेता होणारच चे उमेश कणवलीकर,पोलीस उपनिरीक्षक अनिता होडगे,संस्थेचे विश्वस्त मनसुख गुगळे,खुशालचंद बोरा,रविंद्र धनक,सर्व नगरसेवक,महिला व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

पालकांनी वर्षभरात मुलांमध्ये झालेले बदल व प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे शुभांगी अचपळ यांनी सुञसंचालन केले तर माउली घोडे यांनी अाभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या