वाघाळेत उद्यापासुन जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

वाघाळे,ता.१० मार्च २०१७(सतीश केदारी) : येथे उद्या(ता.११) पासुन जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धांचे अायोजन केले असल्याची माहिती  धिरज दंडवते यांनी दिली.

अधिक माहिती देताना सांगितले कि, वाघाळे येथील अापली माती क्रिडा प्रबोधिनी च्या दुस-या वर्धापनदिनाचे अौचित्य साधुन हे अायोजन करण्यात अाले अाहे.शनिवारी सकाळी ७ ते १ पहिले सञ, ९ते१० या वेळेत खेळाडुंची मिरवणुक, १० ते १२ या वेळेत सत्कार व उदघाटन, तर सायंकाळी ५ ते १० हे सायंकाळ सञ होणार अाहे.दुस-या दिवशी रविवारी(ता.१२) रोजी ७ ते १० पहिले सञ, ६ ते ८ या वेळेत सायंकाळ सञ, व ८ ते ९ या वेळेत बक्षिसवितरण समारंभ होणार अाहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अामदार सुर्यकांत पलांडे हे असुन देवदत्त निकम,जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान हे प्रमुख मान्यवर म्हणुन उपस्थित राहणार अाहेत.प्रतिमापुजन शेखरदादा पाचुंदकर,अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार यांच्या हस्ते होणार असुन मंगलदास बांदल व पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या हस्ते  दिपप्रज्वलन केले जाणार अाहे.

अापली माती क्रिडा प्रबोधिनी गेल्या अनेक दिवसांपासुन महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत असुन वर्धापनदिन साजरा करत अाहे.त्यानिमित्ताने अायोजित केलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे अावाहन करण्यात अाले अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या