वाघाळेत जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १२ संघ सहभागी

वाघाळे, ता.१२ मार्च २०१७ (सतीश केदारी) : अापली माती क्रिडा प्रबोधिनीच्या दुस-या वर्धापनदिनानिमित्त अायोजित केलेल्या खो-खो स्पर्धेत जिल्हयातुन १२ संघ सहभागी झाले असल्याची माहिती धिरज दंडवते यांनी दिली.

वाघाळे येथे अायोजिलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते झाले.या वेळी कर्मवीर साखर कारखान्याचे संचालक अाबासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, कोंढापुरीचे अादर्श सरपंच स्वप्निल गायकवाड अादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी अापली माती क्रिडाप्रबोधिनी विरुद्ध रमणबाग मिञ मंडळ हा सलामीचा सामना खेळवला गेला.यामध्ये अापली माती क्रिडा प्रबोधिनीचा संघ विजयी ठरला.पहिला दिवशी सकाळ व सायंकाळ च्या सञात सामने खेळवले गेले.दोन दिवस सुरु असणा-या या स्पर्धेत पुणे शहर तसेच जिल्हयातुन चौदा वर्ष वयोगटाखालील सुमारे १२ संघांनी सहभाग घेतला अाहे.पुणे जिल्हा असोशिएशन ने पुणे शहर चे चार, पिंपरी चिंचवड चे चार  व रांजणी ,अांबेगाव चे २ पंच नियुक्त केले अाहेत.पंचप्रमुख म्हणुन रोहित वाघ हे काम पाहत अाहे.वाघाळे ग्रामस्थांच्या वतीने जोरदार तयारी केली असुन बाहेरगावावरुन अालेल्या सर्वच खेळाडुंकडे विशेष लक्ष दिले जात अाहे.

अाज दुस-या दिवशी सकाळी रविवारी(ता.१२) रोजी ७ ते १० पहिले सञ, ६ ते ८ या वेळेत सायंकाळच्या  सञात प्रकाशझोतात सामने खेळवले जाणार असुन ८ ते ९ या वेळेत बक्षिस वितरण समारंभ होणार अाहे. या वेळी विविध क्षेञातील मान्यवर उपस्थित राहणार अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या