चिमुकल्यांच्या खेळाने डोळ्यांचे फेडले पारणे

वाघाळे, ता.१३ मार्च २०१७ (सतीश केदारी) : येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत चिमुकल्यांच्या नेञदिपक खेळाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
वाघाळे येथे गेल्या दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेची काल(ता.१२) रोजी मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याने व बक्षिस वितरणाने सांगता झाली.गेल्या दोन दिवसांत सकाळ व सायंकाळ च्या सञात खेळवलेल्या खो-खो सामन्यांत जिल्हाभरातुन दाखल झालेल्या खेळाडुंनी बहारदार खेळ करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

उपांत्य फेरी ही सकाळ च्या सञात पार पडली.या यामध्ये सचिन स्पोर्ट क्लब गुंजाळवाडी,ता.जुन्नर विरुद्ध सन्मिञ स्पोर्टस क्लब कोथरुड यांच्यात झालेल्या लढतीत सन्मिञ ने बाजी मारली.त्याचप्रमाणे इतर तीन संघात संघात मुक्ताई स्पोर्ट्स क्लब इंदापुर ने ४मिनिट राखुन, अापली माती(ब) संघाने १ डाव ३ गुण, व एस.एस.वी. खेड ने १ डाव व एक गुण अशा फरकाने विजय मिळविला.

सेमी फायनल मध्ये अापली माती(ब) संघाने ६ गुण व मुक्ताई स्पोर्ट्स क्लब ने ४ मि.राखुन विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अखेर अापली माती(ब) वाघाळे व  मुक्ताई स्पोर्टस क्लब, शेळगांव इंदापुर या संघामध्ये अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला.

पुणे शहर व पुणे जिल्ह्यातुन वाघाळे येथे भरवलेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत सुमारे १२ संघांनी सहभाग घेतला.तर शेवटच्या दिवशी अांतरराष्ट्रीय पंच जगदिश नानजकर,रांजणीचे संदिप चव्हान, अांतरराष्ट्रीय खो-खो प्रशिक्षक राजेंद्र  साप्ते, पुणे जिल्हा तांञिक कमिटी चे शिरिष मोरे अादींनी हजेरी लावली.ग्रामस्थांनी देखिल अालेल्या मान्यवरांचे स्वागत व उत्तम व्यवस्था ठेवली होती.सायंकाळी उशिरापर्यंत समारोपाचा कार्यक्रम सुरु होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या