'त्या' अारोपीस सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी

निमोणे,ता.१३ मार्च २०१७(प्रतिनीधी) : विवाहितेकडे  शरीरसुखाची मागणी करुन नकार दिल्यानंतर तिक्ष्ण हत्याराने हल्ला करना-या अारोपीस न्यायालयाने सोळा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती शिरुर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर यांनी दिली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे (ता.शिरुर) येथे  शनिवारी (ता.११) अलिम यासिम शेख (रा.दत्तवाडी,शिंदोडी) याने दुपारच्या सुमारास चौतीस वर्षीय महिलेवर राहत्या घराच्या मागच्या बाजुस तिक्ष्ण हत्याराने हल्ला केला होता. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने पुण्यातील सरकारी रुग्णालयात हलविण्यात अाले होते.

या प्रकरणी काल (ता.१२) रोजी शेखला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (ता.१६) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे अादेश दिले. जखमी महिलेच्या सासुने तक्रार दिली आहे. मध्ये अारोपीने शरीरसुखाची मागणी केली असता नकार दिल्याने चिडुन जाऊन चाकुहल्ला केला असल्याचे म्हटले अाहे.

या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर हे करत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या