अहंकाररुपी कंस शरीरातून काढून टाका- गणेश महाराज शिंदे

कासारी, ता.१६ मार्च २०१७(जालिंदर अादक) :  मानवी देह हे देवाचे पविञ मंदिर असुन देहातुन अहंकाररुपी कंस कायमचा काढून टाकला तर निश्चितच परमार्थ घडेल असे प्रतिपादन गणेशमहाराज शिंदे यांनी  बोलताना व्यक्त केले.

कासारी हद्दीतील नर्केवाडीत श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा जिर्नोधार,कलशपूजन आणि श्री.विठ्ठल-रुक्मिणी व श्री.सावतामहाराज या नविन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पार पडला. कलशपूजन व मूर्ती स्थापना ह.भ.प.डॉ.रविदास शिरसाठ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच गणेश महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. या मंदिरासाठी यमुनाबाई पिंगळे, सोनाबाई नरके, गोविंद भूमकर, भरत भूमकर यांनी चार गुंठे जागा देण्यात आली होती त्यानंतर लोकवर्गणीतून व काही वयक्तिक स्वरूपात वर्गणी देऊन बांधकाम पूर्ण करण्यात आले विक्रम भुजबळ यांनी रंगकामासाठी सौजन्य करण्यात आले, बाबुराव भुजबळ यांनी मंदिरातील फरशी दिली. बाळासाहेब खंडू नरके यांनी तीन मूर्ती दिल्या तर नानाभाऊ नर्के,जगननाथ नरके, बाळासाहेब गायकवाड, शांताराम नरके, या सर्वांनी मिळून मूर्ती आणल्या. 

दरम्यान अादल्या दिवशी मूर्तीची मिरवणूक झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश भुजबळ यांनी केले.या वेळी शिक्रापुरचे माजी सरपंच बाप्पू जकाते, कासारीचे माजी सरपंच संभाजी भुजबळ, माजी पं.सदस्य अरुण भुजबळ, शिरूर भाजपा तालुकाध्यक्ष अनिल नवले, रमेश भुजबळ, शामराव फुलावरे,सोपान दरवडे, सुखदेव भुजबळ, भगवान गायकवाड, सोमनाथ भुजबळ, विष्णू नरके, सुखदेव नरके, गोविंद भूमकर, दत्तात्रय नरके, नाथाभाऊ नरके, विकास नरके, बाप्पू नरके, गोपीनाथ नरके, तुकाराम भुजबळ, दत्तात्रय भूमकर, गुलाब नर्के,गोपाळ भुजबळ, दिलीप भुजबळ, पंढरीनाथ भुजबळ, दादाभाऊ भुजबळ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या