तळेगांवातील युवकांनी उभारलीय'माणुसकिची भिंत'

तळेगांव ढमढेरे,ता.१६ मार्च २०१७(सतीश केदारी) : शिवजयंतीदिनी शिरुर तालुक्यात  ठिकठिकाणी डिजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई दिसत असतानाच तळेगांव ढमढेरे येथील काहि युवकांनी 'माणुसकिची भिंत' उभी करत 'अनोखा' संकल्प राबवत समाजासमोर अादर्श निर्माण केला अाहे.

शिरुर तालुक्यात शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे अायोजन करण्यात अाले होते.सकाळपासुन अनेक मंडळांचे कार्यकर्ते  शिवजयंती च्या कार्यक्रमासाठी धडपड करताना दिसत होती.तसेच डिजे च्या तालावर देखिल ठिकठिकाणी जल्लोषात मिरवणुका निघत असल्याच्या दिवसभर पहायला मिळाल्या.

परंतु तळेगांव ढमढेरे येथील काहि युवकांनी एकञित शिवजयंती साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला.काहिंनी शिवरायांचे विचार प्रत्यक्षात अंमलात अाणण्याचा निर्णय घेतला अन यात सामाजिक संवेदनांची जाणीव म्हणुन 'माणुसकीची भिंत' उभारण्याचा निर्णय घेतला.

तळेगांव ढमढेरे येथील पोलीस चौकीच्या नजीक अगदी भर चौकात शिवजयंतीनिमित्त सुरु केलेल्या माणुसकिची भिंत या उपक्रमाबाबत बोलताना स्थानिक तरुणांनी सांगितले कि, हा उपक्रम राबविण्यामागे केवळ सामाजिक भान हाच उद्देश असुन गेल्या दोन दिवसांत तळेगांव ढमढेरे परिसरातील अनेक नागरिकांनी उपक्रमाला प्रतिसाद देत स्वच्छ धुवुन व इस्ञी केलेले कपडे, व वस्तु अाणल्या अाहेत.त्याचप्रमाणे ज्यांना ज्या ज्या वस्तु लागत असतील ते घेउन जात अाहेत.

शिरुर तालुक्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर राबवत असलेल्या या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असुन नागरिकांनी देखिल सामाजिक संवेदना म्हणुन अापल्या जवळील वस्तु या उपक्रमास द्याव्यात असे अावाहन करण्यात अाले अाहे.

तळेगांव परिसरात युवकांनी उभ्या केलेल्या माणुसकिची भिंत उपक्रमामुळे ख-या अर्थाने समाजाला शिवरायांच्या विचारांचा देखिल या तरुणांनी अादर्श घालुन दिला अाहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या