तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेत ३७ शिक्षक सहभागी

जातेगाव बुद्रुक, ता.१७ मार्च २०१७ (प्रा.एन.बी.मुल्ला) : जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे विद्या संकुलात तंत्रस्नेही विषय शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.या कार्यशाळेत जिल्हयातील 37 शिक्षक सहभागी झाले होते.

पुणे जिल्हा शैक्षणिक, सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास संस्था आणि संभाजीराजे विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तंत्रस्नेही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य रामदास थिटे व शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी प्राचार्य थिटे यांनी ‘शैक्षणिक र्इ साहीत्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की तंत्रस्नेही शिक्षक चळवळ राज्यभर सुरू आहे.प्रत्येक वर्गातील विषयनिहाय संकल्पना या व्हिडिओ, पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशन, लिखीत सामुग्री व ब्लॉग याद्वारे पारंपारीक शिक्षणाऐवजी संवादी शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे.तंत्रस्नेही अध्यापकांमुळे हे शक्य होणार असून शिक्षणात नवनिर्मीती होण्यास चालना मिळणार असल्याचेही यावेळी बोलताना त्यांनी सांगीतले.

या कार्यशाळेस गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ, तज्ञ मार्गदर्शक कमलादेवी आवटे, प्रा.सुरेखा दरवडे, संतोष वेताळ, संतोष गावडे, सुनिल मिडगुले, रोहिदास आफळे, विकास गायकवाड, केंद्रसमन्वयक बेबीतार्इ तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या