रांजणगावकर झालेत बिबटयाने ञस्त

रांजणगाव सांडस,ता.१७ मार्च २०१७ (तुषार जगताप) :वारंवार बिबट्याच्या होणा-या दर्शनाने अन देत असलेल्या ञासाने रांजणगांव सांडस ग्रामस्थ ञस्त झाले असुन ग्रामस्थांनी पिंज-याची मागणी केली अाहे.

तीन दिवसांपुर्वी कलावती निवृत्ती भोसले या दुपारी शेळ्या घेऊन शेतात चरायला गेल्या होत्या तेव्हा अचानक समोरच्या उसातून बिबट्या आला व शेळ्यांच्या कळपातील साधारणपणे दीड ते दोन वर्षाच्या शेळीवर बिबट्याने झेप घेऊन त्यांच्यासमोर शेळीला पकडून उसात घेऊन गेला.काहि दिवसांपूर्वी सर्जेराव भोसले यांचे पाळीव कुत्रे देखील बिबट्याने पळवून नेले होते.मागील पाच सहा महिन्यांपासून बिबट्याचे शेतात जाणाऱ्या महिला,शेतातील शेतमजुर तसेच उसतोड़ कामगारांना बिबट्याचे वारंवार दर्शन झाले आहे.

बिबटयांच्या या भीतीमुळे रांजनगाव सांडस येथील नागरिक प्रचंड घाबरुन गेले आहेत व शेतात देखील जाण्यासाठी घाबरत आहेत,त्यामुळे बिबटयांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी राजेंद्र शिंदे,अरुण भोसले,सर्जेराव भोसले,संभाजी लोखंडे,अरुण पाटोळे,उत्तम लोखंडे,राहुल रणदिवे,माऊली रणदिवे,तुषार जगताप,स्वप्निल भोसले,अविनाश पाटोळे,गणेश भोसले यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या