शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी निमोणेत रॅली

निमोणे, ता.२८ मार्च २०१७(प्रतिनीधी) : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी साठी निमोणेत रॅली काढण्यात अाली.या वेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात अाला.

निमोणे (ता.शिरुर) येथील ग्रामस्थांनी सोमवारी  (ता.२७) रोजी सायंकाळी मुख्य चौक ते ग्रामपंचायत कार्यालय असे रॅलीचे अायोजन केले होते. या नंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर सभा घेण्यात अाली. या प्रसंगी सुरेश काळे, तंटामुक्त ग्राम समितीचे मा. अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम जगदाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष काळे, योगेश काळे, मारुती ढोरजकर, भरत काळे अादींनी मनोगते व्यक्त केली.

सरकारचे अनेक निर्णय हे शेतक-यांच्या विरोधात असुन त्याचा फटका शेतक-यांना बसतो.शेतमालाचे पडलेले बाजारभाव, दुष्काळ या मुळे अडचणीत अालेल्या शेतक-याला अाधार देणे गरजेचे असल्याने संपुर्ण कर्जमाफी ही मिळायलाच हवी अशा भावना शेतक-यांनी या वेळी व्यक्त केल्या. या वेळी ग्रामस्थांच्या विविध मागण्यांचे निवेदन सरपंच जिजाताई दुर्गे यांनी स्विकारले.

या प्रसंगी उपसरपंच गणेश काळे, ग्रा. सदस्य धनंजय काळे, पञकार बाळासाहेब गायकवाड, प्रविण दोरगे, सोपान ढोरजकर, सोपान दुर्गे, दादासो पवार शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष भरत काळे, शिवसेना गट प्रमुख संतोष काळे, रोहीदास काळे, नवनाथ गव्हाणे, लक्ष्मण गायकवाड, नानासो दुर्गे, मच्छिंद्र बांदल, सुरेश दुर्गे अादी उपस्थित होते. या रॅलीला निमोणे व परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. रविंद्र थोरात यांनी शेवटी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या