कुरुळीच्या उपसरपंचपदी मंदाताई बोरकर

कुरुळी,ता.३१मार्च २०१७ (प्रतिनीधी) : कुरुळी(ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदी मंदाताई बाळासो बोरकर यांची नुकतीच निवड झाली.प्रतिभा बोरकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद हे रिक्त होते.

कु्रुळी(ता.शिरुर)येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.या वेळी उपसरपंचपदासाठी केवळ एकमेव अर्ज अाल्याने बोरकर यांची निवड करण्यात अाल्याचे रायबा  बोरकर यांनी सांगितले.यानंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात अाला.या वेळी महिलांसाठी विविध उपक्रम राबणार असुन गावच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे बोरकर यांनी बोलताना सांगितले.

या निवडीवेळी मा.सरपंच बी.अार.बोरकर, शहाजी बोरकर, नितीन थोरात अादींनी मनोगते व्यक्त केली. तर माजी सरपंच मनिषा बोरकर,ग्रा.पं सदस्य हजराबी जखाते, प्रतिभा बोरकर, सोनाली देशमुख, शिवाजी निगडे, अप्पा बोरकर, प्रमोद पठाण, संदिप लष्करे, सुमित बोरकर अादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या