तळेगाव–चाकण–न्हावरे रस्ता भूसंपादनात योग्य मोबदला मिळावा

तळेगाव ढमढेरे,ता.८ एप्रिल २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव दाभाडे–चाकण–शिक्रापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्र.55 च्या  रूंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात येत आहे त्यामुळे बाधीत शेतक-यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपजिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनानुसार तळेगाव दाभाडे–चाकण–शिक्रापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्र.55 च्या  रूंदीकरणाच्या कामासाठी तसेच पुढे शिक्रापूर–तळेगाव ढमढेरे–न्हावरे–चौफुला या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.सदर भूसंपादन करताना अधिका-यांनी अकॄषिक जमीनी कॄषिक जमीनी यांना सरसकट एकच दर दिला आहे.वास्तविक कॄषिक क्षेत्रातून जमीन अकॄषिक करण्यासाठी शेतक-यांना बराच खर्च आलेला असतो.त्यामुळे अकॄषिक क्षेत्र असलेल्या शेतक-यावर अन्याय होत आहे.अकॄषिक जमीनीचा दर हा कॄषिक पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तसेच कॄषिक व अकॄषिक या सर्वच जमीनींना योग्य तो भाव देवून बाधीत शेतकáयांना त्याप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

तत्पूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल काशिद, शिरूर तालुका प्रमुख पोपट शेलार, उप तालुकाप्रमुख रोहीदास शिवले तसेच कार्यकर्ते व परीसरातील शेतक-यांनी खासदार आढळराव यांच्याकडे भूसंपादनाच्या जमीनीला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.त्याचाच एक भाग म्हणून जमीनीला योग्य भाव देण्याची मागणी खासदार आढळराव यांनी उपजिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या