गणेगांव मॅरेथॉनमध्ये धावले हजारो तरुण (Video)

गणेगांव खालसा, ता.१७ एप्रिल २०१७ (सतीश केदारी) : पक्ष्यांचा किलबिलाट..पहाटेतील हवेचा गारवा.. अन चौकाचौकात माञ रंगबेरंगी पोशाखात तरुणांपासुन अाबालवृद्धांसह महिलांनी केलेली तोबा गर्दी अशा प्रकारचे रविवारच्या पहाटेचे चिञ येथे पहावयास मिळाले.

गणेगांव खालसा तसं शिरुर तालुक्यातील छोटेसं गांव परंतु शिरुर तालुक्यात प्रथमच या ठिकाणी फ्री रनर चॅरीटेबल ट्रस्ट पुणे व गणेगांव ग्रामस्थांच्या विद्यमाने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे अायोजन केले होते.


एरवी पहाटेची निरव शांतता इतर ठिकाणी अनुभवत असताना या गांवात पहाटे पाचपासुनच सर्व वयोगटातील व्यक्ती या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे चिञ पहायला मिळत होते. सुरुवातीलाच अायोजकांनी सहभागी सर्वांना टी-शर्ट वाटप केले होते. त्यामुळे येथे गुलाबी थंडीत रंगेबेरंगी कपड्यात स्पर्धक पहायला मिळत होते. या वेळी परदेशातून अालेल्या विशेष मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवुन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात अाली.

रविवारी  पहाटे साडेपाच वाजता गणेगांव हायस्कुल येथे प्रारंभ झालेल्या मॅरेथॉन मध्ये शिरूर तालुक्यातील मान्यवरांसह पुण्यातील प्रसिद्ध धावपटू देखिल सहभागी झाले होते. महिला व मुलींसाठी ३ कि.मी धावणे, खुल्या वयोगटासाठी ५ कि.मी, १० कि.मी. धावणे, पुरुष व महिला वयस्करांसाठी ५ कि.मी चालणे अशा पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. या मध्ये सहभागी प्रथम तीन क्रमांकांना करंडक, पुढील पाच क्रमांकांना मेडल, सहभागी खेळाडूंना टि-शर्ट व मुलींना सॅक भेट देण्यात अाली.

ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणी तसेच प्रशासनाच्या वतीने अारोग्य सुविधा उपलब्ध करण्यात अाल्या होत्या. सहभागी स्पर्धकांसाठी पौष्टिक अाहार देण्यात येत होता.

या मॅरेथॉन चे लक्ष वेधुन घेत होते ते परदेशी पाहुणे. इसाबेल रॅगबिरे व शोला कॅरलेटी या परदेशी पाहुण्यांसह फ्री रनर चॅरीटेबल च्या संगिता ललवानी, जितेंद्र नायर, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, पोलीस अधिक्षक अमोल तांबे, शिरुर तालुका डॉट चे सदस्य अादी उपस्थित होते. गणेगाव ग्रामस्थ व गावातील विविध मंडळाच्या सदस्यांनी मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

फ्री रनर चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व निवृत्त नेव्ही कमांडंट जितेंद्र नायर म्हणाले, 'ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धावणे, चालणे लाभदायक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा अशा स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे फक्त येथेच स्पर्धा घेऊन न थांबता संपूर्ण तालुक्यात अशा स्पर्धांचे आयोजन करावे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. महिलाही सहभागी होऊ शकतील. काही दिवसांमध्येच येथील युवक ऑलिंपिकमध्ये दिसतील. आजच्या स्पर्धेत महिलांचा उत्स्फुर्त सहभाग दिसून आला. महिला मोठ्या उत्साहात चालत, धावत होत्या. तालुक्यातील विविध भागांमध्ये अशा स्पर्धांचे आयोजन केल्यास महिलांचेही आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होईल.'

राज्य महामार्गाचे अधीक्षक अमोल तांबे यांनी पुढाकार घेऊन स्पर्धेचे आयोजन केले होते. तांबे म्हणाले, 'शहरी भागातील युवकांच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवकांची तंदरुस्ती खालावलेली दिसते. राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये युवक उतरावेत यासाठी ग्रामीण भागात मॅरेथॉन अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहान देऊन त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.'

तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडूंचा उत्सुफूर्त सहभाग दिसून आला. चिमुकल्यांपासून ते अबालवृद्ध सहभागी होत असताना चालण्याची मॅरेथॅान हा वेगळा आनंद घेता आला. मॅरेथॅान नंतर खेळाडूंना पौष्टीक आहारात अंडी, दुध, केळी, हरभरा देण्यात आला होता. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गणेगाव ग्रामस्थ व युवकांचा मोलाचा वाटा ठरला.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेते पुढीलप्रमाणे-
5 कि.मी. धावणे-
1) किरण आदक, 2) अभिजीत मोरे 3) निखील आदक

10 कि.मी. धावणे-
1) ज्योतीराम कौलगे, 2)लोकेश बुंदेले, 3) कैलास दंडे

3 कि.मी. धावणे-
1) पुनम मांदळे, 2) रीया तांबे, 3) रुपाली डफळ

5 कि.मी. चालणे-
1) देवदास तांबे, 2) आर्जुन खराबे, 3) गणेश टेमगिरे

www.shirurtaluka.comसंकेतस्थळाचे सदस्य ही धावले
शिरुर तालुका डॉट कॉम संकेतस्थळ व विचार मंच चे सदस्य पञकार युनुस तांबोळी व रांजणगांव येथील डॉ.अंकुश लवांडे यांनी देखिल १० किलोमीटर धाव घेत मॅरेथॉन पुर्ण केली. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांच्या मध्ये सकाळपासुनच उत्साहाचे वातावरण होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या