दरेकरवाडीत बिबटयाच्या हल्ल्यात तीन शेळया ठार

तळेगाव ढमढेरे,ता.२६ एप्रिल २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला): दरेकरवाडी येथे बिबटयाने शेळयांच्या बंदीस्त शेडमध्ये प्रवेश करून केलेल्या हल्लात  3 शेळया ठार झाल्या.

दरेकरवाडी येथील शेतकरी मयूर ज्ञानोबा दरेकर यांच्या घराच्या बाजूला शेळंयासाठी बंदीस्त शेड आहे.रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बिबटयाने या बंदीस्त शेडच्या तारा उचकटून आत प्रवेश केला.बिबटयाच्या या हल्यात 3 शेळया ठार झाल्या.

घटनास्थळी बिबटयाचे ठसे आढळून आले आहेत.पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयुर देकर यांनी तातडीने उपसरपंच हिरामण दरेकर, सागर दरेकर व कांही ग्रानस्थांना हा घडलेला प्रकार सांगीतला त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.वाव्हळ यांना घटनेची माहीती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले व पंचनामा केला याप्रसंगी वाव्हळ यांच्या समवेत वनरक्षक एस.जे.राठोड, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे आदी उपस्थित होते.मागील कांही दिवसापासून परीसरात बिबटया असल्याची चर्चा होती.तसेच बिबटयाचे दर्शन झाल्याचेही नागरीक बोलून दाखवत होते.

मात्र बिबटयाने हल्ले केल्याशिवाय वनविभागाला जाग येत नसल्याच्या संतप्त प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करत असून तातडीने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातील नागरीकांनी वनविभागाकडे केली आहे.तळेगाव ढमढेरे, खंडोबाची वस्ती, केवटे मळा, जगताप वस्ती, मुळे वस्ती, गुरवमळा, कमेवाडी, टाकळी भिमा येथे बिबटया वावरत असल्याची माहीती वनविभागाला स्थानिकांनी कळवताच परीसराचा अंदाज घेवून तळेगाव ढमढेरे येथे एक पिंजरा लावण्यात आला अाहे.

परंतु त्यात बिबटया अडकलेला नाही मात्र वेगवेगळया ठिकाणी त्याचे दर्शन होत आहे.उन्हाळयाचे दिवस असल्याने व विजवितरणच्या अवास्तव लोडशेडींगमुळे नागरीकांना रात्रीच्या वेळेस शेतात पाणी देण्याचे काम करावे लागते.मात्र बिबटयाच्या दहशतीमुळे परीसरातील नागरीक चांगलेच धास्तावले आहेत.दरेकर वाडीत बिबटयाने केलेल्या हल्यात शेतक-याचे मोठे नुकसान झाले असून त्याला नुकसान भरपार्इ मिळण्याची मागणीही ग्रानस्थांनी केली आहे.

यावेळी बोलताना वनपरिक्षेत्र अधिकारी वाव्हळ यांनी सांगीतले की दरेकरवाडी येथील घटनेची माहीती मिळताच तात्काळ पंचनामा केला असून संबंधीत शेतक-याला नुकसाब भरपार्इ म्हणून मोबदला मिळवून दिला जार्इल.ग्रामस्थांनी मागणी केल्यास दरेकरवाडी येथे बिबटयासाठी पिंजरा लावण्यात येर्इल असेही त्यांनी यावेळी सांगीतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या