घोडगंगेचे संचालक बाबासाहेब मचाले यांचे निधन

इनामगांव,ता.२ मे २०१७(प्रतिनीधी) : येथील बाबासाहेब मचाले(वय-५१) यांचे अाज(ता.२) रोजी पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बाबासाहेब मचाले हे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक म्हणुन काम पाहत होते.तर इनामगांव सोसायटीचे माजी चेअरमन म्हणुन देखिल त्यांनी केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,आई,दोन भाउ,मुलगा,मुलगी  असा परिवार अाहे.

बाबासाहेब मचाले हे शांत स्वभावाने परिसरात सर्वांना परिचित होते.निधनाची वार्ता कळताच शिरुर चे माजी अामदार व घोडगंगा कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार,जिल्हा परिषद पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांनी दु:ख व्यक्त केले अाहे.तसेच परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या