'सोनाली'च्या फॅन्स चा अनोखा उपक्रम

पुणे, ता.२० मे २०१७(सतीश केदारी) : सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्त सोनालीअन्स या तिच्या ऑफिशियल फॅनक्लबने पुण्यात नुकताच एक आगळावेगळा उपक्रम आयोजित केला होता..

या ग्रुप च्या सदस्यांनी माहिती देताना सांगितले कि,विविध ठिकाणी पक्ष्यांना खाद्य आणि पाणी ठेवण्यासाठी एक विशिष्ट योजना आखली,जेणेकरून या कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांची काळजी घेतली जाईल आणि त्यांना खाद्य तसेच पाण्यासाठी भटकावे लागणार नाही.पुण्यातील नितेश हब येथे प्रतीकात्मक खाद्य आणि पाण्याची व्यवस्था केली व प्रत्येकजण एक एक धान्याचे भांडे आपापल्या घरी घेऊन गेले व या सामाजिक उपक्रमामध्ये आपला हातभार लावला.आपल्याला जमेल तसे जमेल त्याठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा सोनलिअन्स चा मानस आहे.

'सोनालीअन्स' या सोनाली कुलकर्णी चा ऑफिशियल फॅनक्लब आहे.ज्याद्वारे सोनाली च्या चित्रपट -कार्यक्रमांचे प्रमोशन तर होतच असते शिवाय या ग्रुप मधील सदस्य आपल्याला जमेल तशा पद्धतीने समाजकार्य देखील करत असतात.पुण्यात कोरेगाव पार्क,नितेश हब येथे साधारण २५ ते ३० सोनलिअन्सने एकत्र येऊन हा उपक्रम राबवला.

सोनाली देखील स्वतःच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून या उपक्रमाला उपस्थित राहिली होती आणि तिच्याच हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला.मुंबई, पुणे, नाशिक,सातारा कोल्हापूर या ठिकाणाहुन सोनालीयन्स या ग्रुप मधील सोनालियन्सनी एकत्र येऊन हा उपक्रम राबविला.या उपक्रमात सहभागी होऊन पक्ष्यांसाठी,त्या मुक्या जीवांसाठी काहीतरी करता आल्याचे समाधान आणि निर्भेळ आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या