अपंगांसाठी विशेष प्रयत्न करणार-राजेंद्र जगदाळे

करडे,ता.२१ मे २०१७ (तेजस फडके) : शासनाकडे निधी असुनही अपंगांना स्वतःचे हक्क व योजनांच्या मागण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात हि दुर्दैवाची बाब असुन अपंगांसाठी जिल्हा परिषदेत उपलब्ध असणारा निधी त्यांना मिळावा यासाठी व तो योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे शिरुर-ग्रामीण जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेंद्र जगदाळे (पाटील) सांगितले.

करडे(ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या ३ टक्के निधींतून सुमारे ११ लाभार्थ्यांना सिलिंग फॅनचे वाटप जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी सरपंच रुपाली वाळके,उपसरपंच गणेश रोडे,माजी सरपंच कविता जगदाळे (पाटील), ग्रामपंचायत सदस्य विशाल घायतडक,आप्पासाहेब वाळके, संतोष घायतडक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या