भाजीपाला अन दुधाचा एक थेंब ही जाउ देणार नाही

इनामगाव,ता.२ जुन २०१७(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील विविध गावांत ग्रामस्थांनी दुध ओतुन  निषेध सभा घेत आंदोलनात सहभाग घेतला.अनेकांनी भाजीपाला अन दुधाचा एक थेंब ही जाउ देणार नाही अशा प्रकारच्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिरसगांव काटा येथील ग्रामस्थांनी एकञ येत  दुधाच्या किटल्या खाली करत हजारो लिटर दुध ओतुन दिले.या वेळी राहुल कदम, एम.एस.कदम, संजय शिंदे,सागर गराडे, अण्णासो कदम आदी उपस्थित होते.पिंपळसुटी येथील  ग्रामस्थांनी एकञ दुध ओतुन निषेध केला.पिंपळसुटी येथे भाउ खळदकर, काका मोहिते,विष्णु वाबळे,पप्पु फराटे, राहुल खंडागळे, आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

इनामगाव येथे ग्रामस्थांनी निषेध सभा आयोजित केली होती.इनामगाव येथे सुमारे १३ दुध संकलन केंद्रे असुन त्या गावात सुमारे ३०००० लिटर च्या वर दररोज दुध संकलन केले जाते.परंतु गेल्या दोन दिवसांत येथील शेतक-यांनी एक लिटर थेंब देखिल दुध संकलन केले नसुन दुधापासुन उपपदार्थ तयार करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यावेळी  विजय मोकाशी यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करत या गावातुन दुधासह भाजीपाला देखिल पुण्याच्या बाजारात नेणार नसल्याचे सांगितले.श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे बोलताना म्हणाले कि, गेल्या दोन वर्षात शिरुर तालुक्याच्या पुर्व भागाला सतत दुष्काळाला सामोरे जावे लागत असुन सततच्या ञासाला कंटाळुन शेतकरी मेटाकुटीला आला आहे.त्यामुळे सरकारने  शेतक-यांचा अंत पाहु नये.या वेळी ग्रामस्थांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर हजारो लिटर दुध ओतुन देत निषेध व्यक्त केला.या प्रसंगी महेश घाडगे, संजय घाडगे,संजय मचाले,अनिल बगाटे, कैलास गांधले, तात्यासाहेब मचाले आदींनी भाषणे केली तर भरत घाडगे, शरद मचाले, अविनाश गांधले,दत्ताञय घाडगे, सखाराम भालेराव, मनोज घाडगे यांच्यासह दुध संघाचे प्रतिनीधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान गुरुवारी निर्वी(ता.शिरुर) येथील बाजार रद्द करण्यात आला होता तर शुक्रवारी(ता.२) रोजी मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील आठवडे बाजारावर देखिल संपाचा परिणाम झाल्याने एकाही शेतक-याने माल न आल्याने येथील बाजार मैदानावर शुकशुकाट जाणवत होता.कुरुळी (ता.शिरुर) हे गाव तरकारीचे गाव म्हणुन प्रसिद्ध आहे परंतु या गावातुन पुणे मुंबई ला कांदा,वांगी,कोथिंबीर, मेथी, तसेच फळे आदींची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते.दररोज ट्रकच्या ट्रक माल विकला जात असताना गेल्या दोन दिवसांत एकही ट्रक कोणताच भाजीपाला अथवा फळे विक्रीसाठी गेले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात मांडवगण फराटा, इनामगाव, वडगाव रासाई, शिरसगाव काटा, आदी गावोगावी असणा-या दुध संकलन केंद्रे पुर्णत: बंद ठेवल्याने गेल्या दोन दिवसांपासुन या परिसरातुन एकही थेंब दुधाचे संकलन झाले नाही.त्यामुळे सर्व दुध डेअ-यांना कुलुपे असल्याचे दिसुन येत असुन गावोगावी भरणारे आठवडे  बाजार देखिल परिणामी रद्द केले जात आहेत.शेतकरी देखिल या संपांना उत्सफुर्त पाठिंबा देत असल्याचे चिञ आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या