तळेगावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनाला पाठींबा

तळेगाव ढमढेरे,ता.७ जुन २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सभा घेवून शेतक-यांच्या वतीने विविध मागण्या केल्या व शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.        

तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सर्वपक्षीय नेते व कार्यकत्र्यांनी घेतलेल्या सभेत प्रादेशिक कॄषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी संचालक महेश ढमढेरे, शिरूर बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे, माजी सरपंच महेंद्र पवार, उपसरपंच राकेश भुजबळ, शिरूर बाजार समितीचे संचालक विश्वास ढमढेरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, संदीप ढमढेरे आदींची भाषणे झाले.यावेळी बोलताना प्रादेशिक कॄषी उत्पन्न बाजार समीतीचे माजी संचालक महेश ढमढेरे यांनी शेतक-यांच्या वतीने विविध मागण्या मांडल्या.

त्यामध्ये प्रामुख्याने शेतक-यांचे सर्व कर्ज माफ करावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कॄन शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाला हमी भाव द्यावा, शेतक-यांना देखील नोकरदाराप्रमाणे वयाच्या साठी नंतर पेन्शन देण्यात यावी, अल्पभुधारक शेतकरी व इतर शेतकरी असा भेदभाव न करता सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, शेतक-यांना शेतीसाठी मोफत विज द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

शेतक-यांच्या आंदोलनाला तळेगाव ढमढेरे परीसरातून संपूर्ण पाठींबा असून शासनाने या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तिव्र केले जार्इल असा इशाराही यावेळी महेश ढमढेरे यांनी दिला.यावेळी बाळासाहेब ढमढेरे, माजी सरपंच विजय भुजबळ, महेश भुजबळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, शहाजी ढमढेरे, रवि ढमढेरे, योगेश ढमढेरे, गणेश तोडकर, विजय ढमढेरे आदी कार्यकर्ते तसेच परीसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे यांनी सुत्रसंचालन केले तर माजी सरपंच विश्वास ढमढेरे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या