शिरुर तालुक्यात रमजान र्इद उत्साहात साजरी

शिरुर,ता.२७ जुन २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिरुर तालुक्याच्या विविध भागात सामुहिक नमाज पठण करुन व एकमेकांना शुभेच्छा देत रमजान र्इद उत्साहात साजरी करण्यात आली.

शिक्रापूरसह परीसरातील सणसवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखर्इ, कान्हूर मेसार्इ ,निमगाव म्हाळुंगी, जातेगाव, कोंढापुरी, कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी आदी ठिकाणी मोठया उत्साहात नमाज पठण करून र्इद साजरी केली.र्इद हा सण हिंदू – मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानले जाते त्यामुळे अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना र्इदगाह वर हजर राहून तसेच घरोघरी जावून शुभेच्छा दिल्या.महीनाभराच्या उपवासानंतर हा सण साजरा करण्यात येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सामाजीक सलोखा राखण्याच्या दॄष्टिने रमजान र्इदला विशेष महत्व असल्याने यातून शांततेचा व एकतेचा संदेश दिला जातो.नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात रमजान ईद चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील मशिदीत सल्लाउद्दीन अन्सारी, वडगांव रासाई येथील जामा मशिदीत अब्दुल हफिज यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ९ ते ९: ३० या वेळेत नमाज पठण करण्यात आली.शिरसगाव काटा येथील मशिदीतही मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.यावेळी असंख्य संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

सकाळपासुनच परिसरातील ग्रामस्थ एकमेकांना  शुभेच्छा देत शिरखुर्माचा आस्वाद घेत असल्याचे ठिकठिकाणी चिञ दिसत होते.तसेच धार्मिक ऐक्याचे प्रतिक समजल्या जाणा-या ईद च्या सणानिमित्त मिञप्रेमाचे अनोखे दर्शन विविध ठिकाणी दिसुन आले.रविवारी(दि.२५) रोजी चंद्रदर्शन झाल्याने सोमवारी(दि.२६) रोजी अनेकांनी पहाटेपासुनच सोशल मिडियाच्या माध्यमातुन त्याचबरोबर प्रत्यक्ष भेट देउन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.सकाळपासुन अधुनमधुन पडणा-या पावसाच्या सरींनी या सणाची आणखीनच रंगत वाढलेली होती.शिरुर शहरात इदगाह मैदान,क्वॉर्टर गेट मश्जिद,जामा मशिद, कब्रस्तान मश्जिद, मदरसा, मलठण, कवठे येमाई, न्हावरा, रांजणगांव सांडस, आदी प्रमुख मशिदीत हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज अदा केली.या वेळी सर्वांनीच एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या