सुभाष विद्यामंदिरात भरला 37 वर्षानंतर वर्ग

तळेगाव ढमढेरे,ता.३ जुलै २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : येथील सुभाष विद्यामंदिरात 37 वर्षानंतर सर्व वर्ग मित्र–मैत्रीणी एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
 
माजी मेळाव्याची सुरवात शाळेची घंटा वाजवून व प्रार्थना घेवून करण्यात आली.दोन सत्रात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.सकाळच्या सत्रात विद्याथी—शिक्षक परीचय व स्नेह भोजन झाले तर दुपारच्या सत्राची सुरवात हभप गायनाचार्य पोपट विठोबा भुजबळ यांनी सादर केलेल्या र्इशस्तवन, सरस्वती पुजन व दिप प्रज्वलाने करण्यात आली.

माजी मेळाव्याचे औचित्य साधून 1980 च्या बॅचची विद्यार्थीनी भामाबार्इ दरवडे हिला अपघाताने अपंगत्व आल्याने सामाजीक जाणीवेचे भान ठेवून 21 हजार रूपयांची मदत केली व सामाजीक जबाबदारीचा आदर्श घालून दिला.या मेळाव्यात योगायोगाने आलेला राजेंद्र क्षिरसागर व शैला भुजबळ यांच्या लग्नाचा वाढदिवस तसेच ज्योती शहा हिचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन विष्णू कानडे, अनिल ढमढेरे, काळूराम दरेकर, अविनाश ढमढेरे, जयकुमार गुंदेचा, रोहीदास तोडकर, शिरीष गायकवाड यांनी सर्वांच्या सहकार्याने केले.यावेळी विलास पाटील, श्रीम मराठे, श्री कोरडे आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र क्षिरसागर यांनी केले.अनिल ढमढेरे यांनी सुत्रसंचालन केले तर रोहीदास तोडकर यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या