विद्यार्थ्यांनी मनात न्युनगंड बाळगु नये-भोसले

शिरुर,ता.१४ जुलै २०१७(प्रतिनीधी) : नगर परीषद व जिल्हा परीषद शाळांमधुन शिक्षण घेतलेले अनेक जण मोठे अधिकारी झालेले असुन विद्यार्थ्यांनी मनात न्युनगंड बाळगु नये असे प्रतिपादन शिरूरचे तहसिलदार रणजीत भोसले यांनी बोलताना केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शिरूर च्यावतीने शुक्रवार (दि.१४) रोजी नगरपरीषदेच्या १ ते ६ शाळा, माहेर संस्था,मुक बधीर शाळा न्हावरा फाटा,आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी तहसिलदार भोसले बोलत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक,शिक्षण समिती सभापती रोहीणी बनकर,नगरसेवक मंगेश खांडरे,प्रशासन अधिकारी के.के.झारखड,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,निलेश खाबिया,निवेदक संघटनेचे अध्यक्ष संजय बारवकर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे,जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे,उपजिल्हाध्यक्ष अभिजीत आंबेकर,पुणे शहर संघाचे प्रसिध्दी प्रमुख सागर बोधगिरे,हवेली तालुकाध्यक्ष महेश फलटणकर,मुख्याध्यापक संतोष चव्हाण आदिंसह सर्व शाळांचे शिक्षक,विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

नगरपरीषद शाळांमधील विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील असले तरी येथे या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक उच्च शिक्षित असुन ते विद्यार्थ्यांना चांगले शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्यासाठी खुप कष्ट घेत असुन शाळेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी बोलताना शिक्षण समितीच्या सभापती रोहीणी बनकर म्हणाल्या.

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर तालुकाध्यक्ष संतोष शिंदे,सचिव अर्जुन बढे,उपाध्यक्ष शेरखान शेख,शहराध्यक्ष आप्पासाहेब ढवळे,प्रसिध्दी प्रमुख तेजस फडके,सतीश केदारी,जालिंदर आदक,अनिल सोनवणे,भाऊसाहेब खपके आदिंनी विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचालन निवेदक संघटने अध्यक्ष संजय बारवकर यांनी केले तर आभार सचिव अर्जुन बढे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या