गोमांसाची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली (Video)

रांजणगाव गणपती, ता. 16 जुलै 2017 (तेजस फडके): पुणे येथील हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (रविवार) पहाटे ३:३५ वाजता पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती येथे गोमांस वाहतूक करणारी दोन वाहने पकडून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिली. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय २३) रा.रेव्हेन्यू कॉलनी पुणे यांनी तक्रार दिली आहे.पकडलेल्या दोन वाहनांमध्ये गायी व बैलांचे मांस तसेच त्यांची मुंडकी सापडली. रांजणगाव पोलिसांनी यात महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम १९९५ चे कलम ५/क, ९/अ अंतर्गत १२ जणांवर गुन्हे दाखल केले असून, त्यातील दोन आरोपी हे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. त्यातील ९ आरोपींना तत्काळ अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे
१) कौसर नासीर शेख (वय ३७, रा. बीड)
२) अब्दुल नसीम खान
३) महंमद शाहीद शब्बीर (वय २८)
४) आरिफ अहमदलाल कुरेशी (वय २८)
५) महंमद आरिफ दिलबहार खान (वय २५)
६) सलीम कलीम खान (वय २०)
७) महंमद रियासात खान (वय २६)
८) मोसीन आबीद अहमद (वय २२)
९) लाजुद्दीन मेहकु खान (वय २५)

फरार आरोपी
१०) बाबुल शेठ
११) गणी हाजी
१२) वसीम कुरेशी
याबाबत पुढील तपास पोलिस हवालदार नानासो काळे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या