नगरसेवकाच्या वाढदिवसाला विरोध करत खुनी हल्ला

शिरुर,ता.१ अॉगस्ट २०१७(प्रतिनीधी) : शिरुर शहरात नगरसेवकाच्या वाढदिवसाला विरोध करुन त्याला मारहाण,जातीवाचक शिविगाळ व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरुर मधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे शिरुर शहरात खळबळ उडाली असुन चर्चांना उधान आले.

या प्रकरणी शिरुर नगरपालिकेचे नगरसेवक विनोद प्रकाश भालेराव(वय-३१,रा.सैनिक सोसायटी, शिरुर)यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.याबाबतशिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,नगरसेवक विनोद भालेराव यांचा रविवार(दि.३०) रोजी वाढदिवस होता.त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभरात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.नुकत्याच झालेल्या शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकित भालेराव हे वॉर्ड क्रमांक ८ मधुन नगरसेवक म्हणुन निवडुन आले होते.या वॉर्डातील आंबिकामाता चौक, सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी भालेराव यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम राञी आयोजित केला होता.त्या ठिकाणी भालेराव व त्यांचे सहकारी वाढदिवस साजरे करत असताना सतीश घोलप,आकाश पवार, महेश  गायकवाड, व इतर दोन जण पळत येउन,बेकायदा गर्दी जमवुन वाढदिवस कसा करतो असे म्हणुन सतीश घोलप याने अर्वाच्च्य भाषेत शिविगाळ करत इथुन पुढे तुझी माझी दुष्मनी सुरु झाली... असे म्हणत सतीश घोलप याने भालेराव याच्या पोटात लाथ घालुन कोयता भालेराव यांच्याकडे फिरविला.

त्यावेळी फिर्यादीने मारहाण होत  असल्याचे लक्षात येताच झालेला वार चुकविला.त्यावेळेस भालेराव यांची सासु संध्या गजानन पिवाळ हे भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आले असता,त्यांनाही आरोपींनी धक्काबुक्की केली.यावेळी आकाश पवार याने सुरा घेउन फिर्यादीच्या अंगावर धावुन येत असताना लोकांनी त्याला पकडले.याप्रकरणातील मुख्य अारोपी सतीश घोलप याचेविरुद्ध या पुर्वीचे तीन गुन्हे दाखल असुन जानेवारी २०१७ मध्ये तडिपारीचा प्रस्ताव पाठविण्यात अाला असुन प्रलंबित असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी सतिश नारायण घोलप,अाकाश पवार, महेश गायकवाड,व इतर दोन अारोपी(सर्व रा.शिरुर) यांचे विरुद्ध अनु.जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,जिवे मारण्याचा प्रयत्न व अार्म अॅक्ट व इतर गुन्हे दाखल केले असुन या अारोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली अाहेत.या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे हे करत अाहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या