सणसवाडीत 'संपूर्ण डिजीटल स्कुल'चे उद्घाटन

सणसवाडी,ता.४ जुलै २०१७(सुनिल भोंगळ) : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 'संपूर्ण डिजीटल स्कुल' चे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसवाडी येथे 756 विद्यार्थी शिक्षण घेत आहे.शाळेतील वर्गखोल्या,वर्गातील वाढती पटसंख्या आणि इतर समस्येवर मात करत याठिकाणचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण  शाळेत देण्याची तंत्रशिक्षणाची गरज लक्षात घेवून व 'डिजीटल स्कुल ' या संकल्पनेतुन शाळेचा चढता आलेख पाहुन सणसवाडी परिसरातील प्रख्यात 'क्रॉफ्ट्समन ऑटोमेशन प्रा.लि' या कंपनीने शाळेस 42 इंच आकाराचे 13 एल.इ.डी व इंटरअक्टिव्ह बॉर्ड हे साहित्य देणगी रूपाने दिले.

यावेळी बोलतांना शाळेचे मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले म्हणाले की,या साहित्यामुळे शाळेच्या भौतिक वैभवात मोलाची भर पडली आहे.व शाळेची प्रत्येक वर्गखोली डिजीटल झाली आहे.या साहित्यामुळे मुलांचे अध्ययन सुलभ व आनंददायी होवून समाजाचे तंत्रस्नेही भावी नागरिक घडविण्यास मदत होणार आहे.

लोकसभागातुन तयार केलेल्या भव्य अशा संपुर्ण डिजीटल स्कुल चे उदघाटन करण्यात आले यावेळी क्रॉफ्ट्समन ऑटोमेशन प्रा.लि'  कंपनीचे अधिकारी,कर्मचारी  तसेच शाळेचे मुख्याध्यापक पाटीलबुवा ज्ञानदेव मिडगुले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दरेकर,उपाध्यक्ष प्रल्हाद दरेकर,सर्व शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.शाळा जसे उत्तम विद्यार्थी घडविण्यात अग्रेसर आहे.त्याचप्रमाणे शाळेत शिक्षकांच्या बौद्धिक व शैक्षणिक विकासासही या साहित्यांमुळे प्रोत्साहन मिळणार आहे.'क्रॉफ्ट्समन ऑटोमेशन प्रा.लि'  कंपनीने सामजिक बांधिलकी जपत हे साहित्य शाळेला देणगी स्वरूपात दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व सणसवाडी ग्रामस्थानी कंपनीचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या