मराठी क्रांती मोर्चाच्या प्रसारासाठी मोटारसायकल रॅली

शिरूर, ता. 8 ऑगस्ट 2017:  मुंबईमध्ये बुधवारी (ता. 9) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती महामोर्चाचा प्रचार आणि प्रसारासाठी शिरूर तालुक्‍यातील युवकांनी शिरूर शहरातून मोटारसायकल रॅली काढली होती. यावेळी तरुणांसह महिला व मुली भगवे झेंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या.

बाजार समितीतील शिवरायांच्या पुतळ्याला शैलजा दुर्गे यांच्या हस्ते पुष्पहार घातल्यानंतर या रॅलीला सुरवात झाली. रॅलीदरम्यान मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ-जय शिवराय आदी घोषणा दिल्या. रॅलीत शहर व परिसरातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांच्या पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता झाली.

मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव गायकवाड यांनी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत 9 ऑगस्टच्या महामोर्चाच्या आचारसंहितेबाबत युवकांना मार्गदर्शन केले. मराठा आरक्षण, कोपर्डीच्या आरोपींना फाशी, ऍट्रॉसिटीमध्ये सुधारणा या आपल्या प्रमुख मागण्या आहेत. याव्यतिरिक्त कुणीही स्थानिक पातळीवरील मागण्या पुढे करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या