बाळासाहेब टेमगिरे यांची अध्यक्षपदी निवड

शिरूर, ता. 8 ऑगस्ट 2017: अखिल हवेली तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब पिराजी टेमगिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. पारोडी येथील रहिवासी असलेले बाळासाहेब टेमगिरे यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला आहे. विविध शाळांमध्ये त्यांनी शिकविण्याचे काम केले असून, अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. सध्या ते डोमखेल (ता. हवेली) येथे शिकविण्याचे काम करत आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या