शिरुर तालुक्यात स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा

शिरुर,ता.१६ अॉगस्ट २०१७(विविध प्रतिनिधींकडून) : शिरुर शहरासह शिरुर तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शिरुर तहसिल कार्यालय येथे शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील व इतर पोलीस कर्मचा-यांनी शासकिय इतमामात ध्वजास सलामी दिली.या वेळी तहसिलदार रणजित भोसले, आमदार बाबुराव पाचर्णे, गटविकास अधिकारी संदिप जठार, आजी माजी तालुक्यातील लोकप्रतिनीधी उपस्थित होते.या वेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी बहरादार देशभक्ती गिते सादर केली.शिरुर नगरपरिषद कार्यालय, सी.टी.बोरा कॉलेज, विद्याधाम प्रशाला, तसेच शिरुर शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांनी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

रामलिंग रोड लगत  असणा-या आकांक्षा एज्युकेशन या विशेष मतिमंद मुलांच्या संस्थेत आदेश गुंदेचा व मनसुख गुगळे यांच्या हस्ते ध्वजपुजा व ध्वजवंदन करण्यात आले.या प्रसंगी उद्योजक दत्ता केदारी, डॉ.मनिषा चोरे, राजेंद्र मुंजाळ, आदी उपस्थित होते.या प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका राणीताइ चोरे यांनी संस्थेविषयी अडचणी व भविष्यातील हाती घेण्यात येत असलेले प्रकल्प याबाबत माहिती दिली.आलेल्या मान्यवरांनी विशेष मुलांना खाउवाटप करुन शुभेच्छा दिल्या.

शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागातही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये शिंदोडी येथे चिमकुल्यांनी महापुरुषांविषयी भाषणे सादर केली.शिरसगाव काटा, गोलेगाव, टाकळी हाजी, वाघाळे, निमोणे, रांजणगाव गणपती या परिसरात ध्वजवंदनानंतर कवायती, सामाजिक प्रबोधनात्मक नाट्ये, व बहारदार नृत्यांवर चिमुकल्यांनी गिते सादर केल्याचे चिञ ठिकठिकाणी पहायला मिळत होते.

शिरुर तालुक्यात सर्वञ स्वातंञ्यदिनानिमित्त उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पहायला मिळत होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या