शिरुर तालुक्यात धाडसञाने 'बड्या माश्यांचे' धाबे दणाणले

रांजणगाव गणपती,ता.१७ अॉगस्ट २०१७(विशेष प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात कमी कालावधीत ऐशोआरामात फिरत  'गर्भश्रीमंत' झालेल्या अनेक बड्या माश्यांचे आयकर विभागाने धाडी टाकल्याने चांगलेच धाबे दणाणले आहे.

शिरुर तालुका निवडणुका झाल्यानंतर तसा गेल्या अनेक दिवसांपासुन शांततेत नांदत  होता.परंतु अचानक तालुक्यात आयकर विभागाने धाडी टाकल्याने शांतता भंग पावत राजकिय वर्तुळासह सर्वच क्षेञात एकच खळबळ उडाली.सन २००५ सालापर्यंत शिरुर तालुक्याची दुष्काळी तालुका  म्हणुन ओळख होती.सन १९९८ साली तालुक्यात रांजणगाव -कारेगाव येथे औद्योगिक वसाहतीसाठी भुसंपादनाची प्रक्रिया सुरु करण्यात आली.२००० सालापासुन या वसाहतीत राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उभारणीला प्रारंभ झाला.हळुहळु कारखान्यांचा विस्तार होउ लागला.या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचे वैशिष्टय म्हणजे प्रशस्त रस्ते, प्रशस्त दुभाजक, मोठ्या प्रमाणावर लावली गेलेली झाडे, आकर्षक व लख्ख अशी प्रकाशव्यवस्था, मुबलक पाणी पुरवठा, यातच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आकर्षक अशा वास्तु येथे उभ्या राहु लागल्या.दुष्काळाने वर्षानुवर्षे पोळलेल्या तालुक्यातील तरुणांना यामुळे रोजगाराची संधी यामुळे निर्माण झाली.पाहता पाहता व्हर्लपुल, एल.जी, पेप्सिको, फियाट, करारो इंडिया, नानको, जेबील, झामील स्टिल, आय.टी.सी, सोरोव्हस्की, व्हिल्स इंडिया, कल्यानी, टाटा, जोतुन, यझाकी इंडिया अशा  राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय छोट्या मोठ्या १५० हुन अधिक कंपन्यांचे जाळे पसरले.

औद्योगिकिरणामुळे आर्थिक विकासाला चालना मिळाली.रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी, या ग्रामपंचायती कारखान्यांकडुन मिळणा-या करामुळे कोट्याधीश ग्रामपंचायती म्हनुन ओळखु लागल्या. पुणे नगर रस्त्यावर असणा-या कारेगाव, सरदवाडी, रांजणगाव, या गावांमध्ये नागरिकिकरण वाढले. रोजगारानिमित्त परराज्यातुन,परजिल्हयातुन आलेल्या कामगार वर्गामुळे या गावांवर अतिरिक्त ताण पडु लागला.माञ यातुन छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना चांगल्या संधी देखिल निर्माण झाल्या.या कामगारांना राहण्यासाठी म्हणुन या गावांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर नवीन बांधकामे उभी राहु लागली.अनेकजनांना खोल्यांच्या भाड्यांमधुन महिन्याला लाखात पैसे मिळु लागले.कधी-कधी गावात मोजकी दुकाने बघायला मिळायची.आता छोटे मॉल ही उभे राहिल्याचे दिसते.छोट्या-मोठ्या दुकानांची संख्यातर प्रचंड वाढली.यानिमित्ताने व्यावसायिक इमारतींचे जाळेही वाढले.जिल्हयात शिरुर तालुक्याइतके जमीनीचे दर नाहीत.त्यामुळे या तालुक्यात गुंठापतींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. हे दर गगणाला भिडु लागले.कमांडर,ट्रॅक्स, सुमो, अशा गाड्या सर्वसाधारण 2000 सालापर्यंत पहायला मिळायच्या.आज तालुक्यातील परदेशी बनावटीच्या महागड्या अलिशान गाड्यांची रेलचेल दिसुन येते.

यातुनच अल्पावधीत अनेकजण अल्पावधीत श्रीमंत झाले.यात काहींनी साम..दाम..दंड..भेद..चा वापर करत औद्योगिक परिसरात ठेकेदारी सुरु केली.त्यातुन अनेकांनी मोठ्या प्रमाणावर माया जमवली.तर अनेकांनी जमीन-खरेदी विक्रीच्या माध्यमातुन भरमसाठ पैसा कमावला.यातुनच राजकिय वलय व सुरक्षा कवच प्राप्त करुन घेण्यासाठी निवडणुका लढवायला सुरुवात केली.त्यात निवडणुका आल्या कि उधळपट्टी करायची,कार्यकर्ते सांभाळायचे म्हटले कि त्यांची प्रत्येक ठेप ठेवणे आलेच.त्यातही  वाढदिवस असेल तर झगमगाटात साजरा करण्याचे फॅड आले.एकेकाळी हजारांच्या पटीत होणारी निवडनुक लाखो-करोडो रुपयांत होउ लागली. दिवसेंदिवस यात गुन्हेगारीने तर माञ उच्छादच मांडला गेला.यात कंपन्यांच्या अधिकारी वर्गाला धमकावण्याचे प्रकार घडु लागले.पण यात भितीपोटी कोणी जाहीर ना वाच्यता केली ना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.सर्व काही मॅनेज होत असल्याने आमचे कोणीच काही वाकडे करु शकत नाही अशा प्रकारचा विश्वास यांमध्ये निर्माण झाल्याने अशा माश्यांचे चांगलेच फावले.काहींनी तर यातुन गडगंज माया गोळा केली.सर्व काही दाबले अन दबले जात असल्याने औद्योगिककरणात यांची वेगळीच छाप उमटु लागली.शिरुर तालुक्यात अशा प्रकारच्या नव्या गुन्हेगारीचा जन्म झाला.यातुन अनेक दादा..भाई.. निर्माण झाले.माञ या सर्वांवर आयकर विभागाची करडी नजर होती.आयकर विभागाने या पुर्वीही शिरुर तालुक्यात काहींची चौकशी केलेली होती.या वेळी माञ मोठ्या नेत्यावर छापा टाकल्याने तालुक्यात गलेलठ्ठ झालेल्या लॉबीचे अचानक धाबे  दणाणले आहेत.नागरिकांमध्ये अनेक पुढारी, सरकारी अधिकारी, बिल्डर यांनी अमाप माया जमविल्याची नागरिकांमध्ये चर्चा असुन आयकर विभागाच्या गळाला आता कोणकोण लागणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहे.या झालेल्या धाडसञामुळे अवैध मार्गाने माया जमविणा-यांची पाया खालची वाळु सरकली हे माञ नक्की.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या