अशोक पवारांवरील आरोप कदापि सहन करणार नाही

शिरुर, ता. २० अॉगस्ट २०१७ (सतीश केदारी) : अशोक पवार यांनी शिरुर-आंबेगाव असा भेदभाव कधीच मानला नाही त्यामुळे त्यांच्यावर चुकिचे आरोप केले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी घेतलेल्या पञकार परिषदेत बोलताना सांगितले.

घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष व शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी कारखान्याच्या उपाध्यक्षपदासह, कारखान्याचे संचालक, शिरुर बाजार समितीचे संचालक या सर्व पदांचा राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्याने शिरुर तालुक्यात एकच खळबळ उडाली.तर पवार यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला असला तरी पक्ष सोडुन भाजप मध्ये जाणार नसल्याचे सांगितले होते.तसेच विविध प्रकारची वृत्त पसरले गेल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पञकार परिषद घेउन भुमिका मांडली.

या वेळी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी बोलताना स्पष्ट केले कि, राजीनाम्याचा विषय कारखान्यावरुन सुरु झाला.प्रथम उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे हे होते.त्यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रकाश पवार यांना संधी देण्यात  आली होती.त्याचप्रमाणे अशोक पवार यांचे नेतृत्व चुकिचे आहे हे दाखविण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो चुकिचा आहे.शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक अशोक पवार यांच्या विचाराशी ठाम असुन खंबीरपणे उभे आहेत.या वेळी बाबासाहेब फराटे यांनीही बोलताना प्रकाश पवार यांच्या घोडगंगेच्या राजीनाम्याबाबत बोलताना, पवार यांनी कारखान्याच्या पदाचा दिलेला राजीनामा हा व्यक्तिशा घेतलेला निर्णय असुन कारखान्याच्या इतर संचालक मंडळाचा कोणताही संबंध येत नसल्याचे सांगितले.राष्ट्रवादी पक्षात फुट पडली असल्याच्या बातम्या या निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजेंद्र नरवडे यांनी बोलताना सांगितले कि, मी ही ३९ गावातील प्रतिनीधी असुन शिरुर-आंबेगाव असा कोणताही वाद उद्भवण्याचा प्रश्नच नसल्याचे सांगितले.राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कुंडलिक शितोळे यांनी सांगितले कि, अशोक बापु व पोपटराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण बरोबर असल्याचे स्पष्ट करत ज्यांनी विरोधी मते प्रदर्शित केली आहे,त्यांची ती वैयक्तिक मते असल्याचे स्पष्ट केले.जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील यांनी, सर्व जि.प.सदस्य हे अशोक पवार यांच्यासोबत  असल्याचे सांगितले.

या वेळी गोविंद निंबाळकर यांनी बोलताना सांगितले कि, ज्यांनी मते व्यक्त केली आहेत, त्यांनी संयम राखुन बोलायला हवे.शिरुर-आंबेगाव असा वाद निर्माण करुन वेगळी चुल मांडण्याचा प्रयत्न करु नये.एकोप्याचा विचार करावा असे मत व्यक्त केले.या प्रसंगी खरेदीविक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब नागवडे, घोडगंगेचे संचालक सुभाष कळसकर, सचिन पवार, महेंद्र बिडगर,दत्ताञय फराटे, प्रा.सुभाष कळसकर, शरद साठे, महेंद्र बिडगर, सतीश पवार, आदी उपस्थित होते.

बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याने तालुक्यात चांगल्याच चर्चा रंगत असुन विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या