शिरुर शहरात नगरपालिकेकडुन धुरळणी सुरु

शिरुर,ता.४ सप्टेंबर २०१७(प्रतिनीधी) : शिरुर शहरात रविवारी(ता.३) रोजी धुरळणी फवारणी यंञांच्या साहाय्याने विविध ठिकाणी यंञाद्वारे फवारणी करण्यात येत असुन नगरपालिकेचे नगरसेवक, कर्मचारी घरोघरी जाउन जनजागृती करत आहेत.

शिरुर शहरात गुरुवारी डेंग्यु ने महिलेचा मृत्यु झाल्यानंतर अचानक खडबडुन जागे झालेल्या नगरपालिकेसह तालुका आरोग्य विभागाने रविवारी शहराच्या विविध भागात जाउन नागरिकांमध्ये जनजागृती करत स्वच्छता करुन घेतली.विविध ठिकाणी माहिती सर्व्हेक्षण करण्यासाठी नगरपालिकेचे व आरोग्य विभागाचे असे मिळुन एकुण ४२ कर्मचारी काम करत आहेत.या पथकाने डेंग्यु सदृश्य रुग्णांच्या व विविध ठिकाणी जात प्रत्यक्ष पाहणी केली.सायंकाळी ५ते ९ या वेळेत सुमारे सात धुरळणी यंञाच्या साहाय्याने फवारणी करण्यात येत असल्याचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे सभापती सचिन धाडिवाल, पाणी पुरवठा सभापती मुजफ्फर कुरेशी यांनी सांगितले.

नगरपालिकेच्या कर्मचा-यांसह आरोग्य विभागही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवुन काटेकोरपणे सर्व बाबींचे निराकरण करण्यात येत असुन स्वच्छता करणे, प्रत्यक्ष पाहणी करणे, नागरिकांना मार्गदर्शन करणे आदी काम तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, आरोग्य पर्यवेक्षक जे.जी.मारणे, आरोग्य सेवक आर.व्ही.भोस यामच्याकडुन केले जात आहे.या फवारणीवेळी व स्वच्छता कामी प्रशासनाला व नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुजफ्फर कुरेशी यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या