तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा न्हावरेत उत्साहात संपन्न

न्हावरे, ता.५ सप्टेंबर २०१७ (प्रतिनीधी) : न्हावरे (ता.शिरुर) येथे दोनदिवसीय भरलेल्या शिरुर तालुका कबड्डी स्पर्धेत शिरुर तालुक्यातुन एकुण १५१० खेळाडुंनी सहभाग नोंदविल्याची माहिती दादासाहेब उदमले यांनी दिली.

न्हावरे(ता.शिरुर) येथे नुकतीच दोनदिवसीय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.या मध्ये तालुक्यातुन सहभागी झालेल्या उत्कृष्ट खेळाची चुणुक दाखवत उपस्थितांच्या डोळ्याची पारणे फेडली.

या वेळी सरपंच रोहिणी कोरेकर, बाजार समिती संचालक वसंत कोरेकर, माजी पशुसंवर्धन सभापती मनिषा कोरेकर, मुख्याध्यापक औटी सर, आदी उपस्थित होते.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास खंडागळे, बाळासाहेब भालेराव, शरद दुर्गे , नामदेव कंठाळी, इकबाल शेख, संतोष साळुंके, यांनी परिश्रम घेतले.यात प्रथम विजयी झालेल्या खेळाडुंना जिल्हास्तरावर खेळण्याची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाने-(मुले)
14 वर्षे वयोगट
 • प्रथम -श्री भैरवनाथ विद्यालय पाबळ
 • द्वितीय-श्री दत्त माध्य. विद्या. पिंपरखेड
 • तृतीय-श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण
17  वर्षे मुले
 • प्रथम-श्री मल्लिकार्जुन माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय न्हावरे
 • द्वितीय-न्यु इंग्लिश स्कूल उरळगाव
 • तृतीय-श्री दत्त माध्य. विद्या. पिंपरखेड.
19 वर्ष
 • प्रथम-श्री गुरुदेवदत्त विद्या.  संविदणे
 • द्वितीय-सी टी बोरा काॅलेज शिरूर
 • तृतीय-श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा
शिरूर तालुका कबड्डी स्पर्धा निकाल (14 वर्षे मुली)
 • प्रथम -न्यु इंग्लिश स्कूल उरळगाव
 • द्वितीय-शरदचंद्रजी पवार माध्य. विद्यालय वढु बु:
 • तृतीय-भैरवनाथ माध्य. विद्यालय आलेगाव
17 वर्षे मुली
 • प्रथम- नागेश्वर विद्यालय निमोणे
 • द्वितीय -न्यु इंग्लिश स्कूल उरळगाव
 • तृतीय-श्री दत्त माध्य. विद्यालय पिंपरखेड
19 वर्षे मुली
 • प्रथम - संभाजी राजे माध्य. विद्यालय जातेगाव
 • द्वितीय-सी टी बोरा काॅलेज शिरूर
 • तृतीय-भैरवनाथ माध्य. विद्या. आलेगाव.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या