युवकांनी उपोषणाचे हत्यार उपासताच रस्ता खुला... (Vdo)

पाबळ, ता. ९ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : अनेक अधिकारी आले अन् बदलून गेलेही पण तरुणांनी उपोषणाचे हत्यार उपासताच अनेक वर्षांपासून बंद असलेला पाणंद रस्ता खुला करण्यात आला.


सविस्तर असे कि, पाबळ येथील पाणंद रस्ता गेल्या काही वर्षांपासून अडविल्यामुळे बंद होता. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. हि अडचण लक्षात घेत येथील युवकांनी रस्ता खुला करावा या मागणीसाठी चार वर्षापासून शासनदरबारी कागदोपञी पाठपुरावा सुरु केला. तलाठी ते तहसिलदारांपर्यंत पायघड्या घालून वेळोवेळी  विनंती करण्यात आली. परंतु तरीही यातून मार्ग निघत आहे. यावर शिरुर तालुक्यातील दोन तहसिलदारही बदलुन गेले. अनेक अधिका-यांच्या बदल्याही झाल्या तरीही रस्त्याचे घोंगडे भिजत ठेवत डोळेझाक केली. येथील युवक व ग्रामस्थांनी न हारता शासनदरबारी पाठपुरावा सुरु ठेवला.

पावसाळ्यात होणारी अडचण लक्षात वारंवार खेट्या घालुन अखेर प्रशासन कोणतेही पावले उचलत नसल्याने येथील युवकांनी उपोषण करण्याचे ठरवले अन् त्यानुसार संबंधित विभागाला लेखी पञे सादर करण्यात आली. या वेळी जि.प सदस्या सविता बगाटे यांनी लक्ष घालत युवकांना पाठिंबा देत तहसिलदारांशी चर्चा केली. परंतु तरुणांनी उपोषणाचे हत्यार उपासताच गेल्या अनेक वर्षांपासुन झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनालाही जाग आली अन् तातडीने हालचाली सुरु झाल्या. अखेर एकदिवसीय उपोषण करताच रस्ता खुला करण्यात आला. या वेळी अमोल जाधव, हरिभाऊ जाधव, विकास जाधव, सचिन जाधव, गणेश जाधव, यांसह ग्रामस्थ, प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, गावातील कवीता शिंदे यांचा रस्ता खुला करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर पाठपुरावा सुरू होता. सर्वांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले आहे, यामुळे आनंद झाल्याचे शिंदे यांनी www.shirurtaluka.com सोबत सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या