युवासैनिकांनी युवकांचे प्रश्न सोडवावेत-गणेश कवडे

रांजणगाव गणपती,ता.१९ सप्टेंबर २०१७(सतीश केदारी) : युवासैनिकांनी प्रत्येक गावोगावी युवासेनेच्या शाखांची स्थापना करून तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व युवकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत राहुन शिरूर लोकसभा मतदार संघात युवासेनेचे वादळ उभे करावे असे प्रतिपादन युवासेनेचे जिल्हाप्रमुख गणेश कवडे यांनी केले.

रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथे शिरुर-हवेली व शिरुर आंबेगाव या तालुक्यातील कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली.या वेळी कवडे हे बोलत होते.या वेळी कवडे यांनी बोलतानाशिक्षण, आरोग्य व रोजगार या क्षेत्रात प्रभाविपणे काम करून शिरूर- हवेली शिरूर-आंबेगाव या तालुक्यातील प्रत्येक गावातील युवकांना युवासेनेत सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी युवा सेनेच्या तालुका कार्यकारणी मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व युवासैनिकांची मुलाखत केसनंद फाटा, वाघोली व रांजणगाव येथे युवासेना जिल्हा प्रमूख गणेश कवडे, युवासेना जिल्हा चिटणीस सचिन बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या. यावेळी उपजिल्हा अधिकारी विपुल शितोळे, रोहित कुरंदळे, तालुका अधिकारी माऊली घोडे, विशाल सातव, शिरूर शहर अधिकारी सुनिल जाधव, तालुका चिटणीस वैभव ढोकले, प्रकाश लोले, तालुका समन्वयक अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिरूर, शिरूर आंबेगाव व हवेली तालुक्यांतील युवासेना पदाधिकारी व युवासैनिक हजर होते.

मुलाखत दिलेल्या सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांची यादी शिरूर लोकसभा मतदार संघाचे कार्यसम्राट खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना भवन, मुंबई यांचेकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवून लवकरच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल अशी माहीती युवासेनेचे पुणे जिल्हा चिटणीस सचिन बांगर यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अॅड. अविनाश रहाणे व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख राम  गावडे, युवासेना पुणे जिल्हा संपर्क अधिकारी समाधान सरवणकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हासंघटक श्रद्धाताई कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, रविंद्रजी करंजखेले, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, सुनिलभाऊ बाणखेले, पोपट शेलार,गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर-हवेली शिरूर-आंबेगाव या तालुक्यात युवासेनेच नव्याने विस्तार केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या