जर्मनी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी शिरुरच्या मुलींची निवड

शिरुर, ता.२२ सप्टेंबर २०१७ (सतीश धुमाळ) :  जर्मनी येथे होणा-या ज्युनियर मेटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी शिरुर शहरातील दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.

शिरुर येथील आठव्या इयत्तेत शिकत असलेल्या विधी विनोद बोथरा हि विजयमाला इंग्लिश मिडियम स्कुलला शिकत आहेत तर तनिष्का संदेश दुगड ही सेंट जोसेफ या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. संपुर्ण भारतातुन गणित विषयासंदर्भात असणा-या या स्पर्धेसाठी एकुण १६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्या पैकी पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातुन या दोघींची निवड करण्यात आली असून, येत्या १ ते ३ अॉक्टोबर ला हि स्पर्धा जर्मनीतील बेलिफिल्ड येथे पार पडणार आहे.या स्पर्धेसाठी एकुण ९० देशांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

या दोन्ही विद्यार्थीनींना कुमार बरमेचा व सोनाली बरमेचा,पिटर वापी यांनी मार्गदर्शन केले असुन मार्गदर्शक शिक्षकांचे व या विद्यार्थिनींचे आमदार बाबुराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, उद्योगपती प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,राजेंद्र शिंदे, सकल जैन समाज यांनी अभिनंदन केले असून संपुर्ण तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या