आदिशक्तीची उपासणा अर्थात नवराञीचा उत्सव (Video)

शिरूर, ता. 26 सप्टेंबर 2017 (सतीश केदारी): आदिशक्तीची उपासणा अर्थात नवराञीचा उत्सव हा संपूर्ण राज्यभर उत्साहाने नऊ दिवस साजरा केला जातो. शिरुर तालुक्यात पुरातन काळापासून काही शक्तिपीठे समजली जाणा-या मंदिरांमध्ये या देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. उत्सव साजरा केला जातो. आज आपण महत्त्वाची धार्मिक अन् पर्यटन स्थळांची माहिती घेणार आहोत.

टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे मळगंगा देवीचे मंदिर आहे. या ठिकाणी एक मंदिर शिरुर तालुक्यात अन् दुसरे निघोज (ता. पारनेर) या ठिकाणी वसलेले आहे. या दोन मंदिरांमध्ये केवळ नदीच आडवी एवढेच काय ते अंतर. या ठिकाणी जगप्रसिद्ध रांजनखळगे हेही पहायला मिळते. कवठे येमाई येथील येमाई देवी जागृत देवस्थान. या ठिकाणी दस-याच्या अगोदर मोठा होम-हवनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. कान्हुर मेसाई तसे डोंगरांच्या कुशीत दडलेले गाव. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या गावात या देवीच्या मंदिराबाबत फार जुना इतिहास सांगितला जातो. या ठिकाणी राज्यभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. पाहुया ही मंदिरे अन् थेट दर्शनाचाच लाभ घेऊया तर मग...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या