वढू बुद्रूकचे माजी सरपंच प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात

शिरूर, ता. 30 सप्टेंबर 2017: वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांचे पुणे-हडपसर व कोरेगाव भिमा येथील मंगलमूर्ती वास्तू कंपनीच्या पाच कार्यालयांवर प्राप्तिकर खात्याने छापा टाकला आहे. शिवले हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.

कोरेगाव-भिमा (ता.शिरूर), हडपसर (ता.हवेली) येथील प्रत्येकी एक तर चंदननगर (पुणे) येथील तीन कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाचे 25 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी हा छापा टाकला. शिवले हे फ्लॉटिंगच्या व्यवसायाबरोबरच मंगलमूर्ती वास्तू प्रा. लिमिटेड कंपनीद्वारे ते सक्रिय आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर खात्याचे अतिरिक्त आयुक्त हितेंद्र निनावे, सहायक आयुक्त एस.के.आगल आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. शिवले यांचे सर्व व्यवहार, त्यांची सर्व बॅंक खाती, लॉकर्स आदींची कसून चौकशी चालू असून, सर्व चौकशी पूर्ण झाल्यानंतर खात्याचे वतीने कारवाईची माहिती खात्याकडून देण्यात येईल.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांचेबरोबरच शिरुरच्या राजकारणात सक्रीय असलेल्या अनेक राजकारण्यांवर प्राप्तीकर खात्याने गेल्या दोन महिन्यात आपली नजर वळविली आहे. बांदल यांचेबरोबरच राष्ट्रवादीचा एक माजी उपसभापती, जिल्हा बॅंकेचे एक संचालक, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष अशा सर्वांवर छापे करुन प्राप्तिकर खात्याने या सर्वांच्या व्यवहारांची चौकशी केली आहे. शिरूर तालुक्यातील अनेकजण प्राप्तिकर विभागाच्या नजरेत असल्याचे वृत्त www.shirurtaluka.comने यापुर्वीच दिले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या