शिरूरकरांचा महसूल खात्यावर आजिबात भरोसा नाय...

शिरूर, ता. 8 ऑक्टोबर 2017 (सतीश केदारी): शिरूर तालुक्यातील नागरिकांचा महसूल खात्यावर आजिबात भरोसा नसल्याचे www.shirutaluka.comने घेतलेल्या मतचाचणीतून उघड झाले आहे.

शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirutaluka.comने 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2017 या कालावधीमध्ये 'शिरूर महसूल खात्याच्या कामकाजाबाबत आपण समाधानी आहात का?' अशी मतचाचणी घेतली होती. या कालावधीमध्ये 100 टक्के नागरिकांनी आपण शिरूर तालुक्यातील महसूल खात्याच्या कामकाजाबाबत समाधानी नसल्याचा कौल दिला आहे.

शिरूर तालुक्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या अधिका-यांनी लावलेल्या जाळ्यात सर्वाधिक महसूलचे पदाधिकारी सापडले आहेत. महसूल खात्यांसंबंधी कोणतेही काम हे पैसे दिल्याशिवाय होत नाही. महसूल खात्याच्या कामकाजाबाबत कोणीच समाधानी नसल्याचे दिसत आहे. भ्रष्टाचारमुक्तीपासून दूर करण्याचे आश्वासन देणार मोदी सरकार आता तरी शिरूर तालुक्यात लक्ष घालणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना एकाबाजूला पडला आहे. महसूल विभागातील पदाधिकाऱयांना भ्रष्टाचार करण्यास कोण परावृत्त करत आहे अथवा कोण पाठिशी घालत आहे, हे सुद्धा सर्वांनाच ज्ञात आहे. शिरूर तालुक्यातील लोकप्रतिनीधींना अथवा वरिष्ठाना किती हप्ते द्यावे लागतात, हे न सांगितलेले बरे. हे वाक्य आहे, एका सरकारी अधिकाऱयाचे. भ्रष्टाचार रोखायचा असेल तर यांना हप्ते कसे द्यायचे. हप्ते न दिल्यास बदली ठरलेलील. एका अधिकाऱयाकडून हप्ता कमी झाल्यानंतर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे हे सर्व करावेच लागते, हे सरकारी अधिकारी गुपचूपपणे सांगतात. परंतु, या भ्रष्टाचारामध्ये सर्वसामान्यांचा जीव जात आहे.

या सर्व प्रकारावरून भ्रष्टाचार थांबणार का? हा प्रश्न आहे. महसूल खात्यावर शिरूरकरांचा भरोसा राहिला नसला तरी भ्रष्टाचार कोणामुळे करावा लागत आहे, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मोदी सरकारने याकडे वेळीच लक्ष घालणे जरूरीचे आहे, अन्यथा गदारोळ माजला जाईल.

भष्ट्राचारासंबंधीतील बातम्याः

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या