शिरुरला दोन अपघातात पिता-पुञाचा दुर्दैवी मृत्यु

शिरूर,ता.९ अॉक्टोबर २०१७ (प्रतिनिधी) :  शिरूर बाह्य मार्गावर रविवारी पहाटे एका अल्टो कार व ट्रक च्या झालेल्या अपघातात कुटुंबातील पित्याचा मृत्यु झाला.तर तीन गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर स्कॉर्पिओ उलटुन झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यु झाल्याची घटना  घडली.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अहमदनगर जिल्ह्यतील भूतकर वाडी येथील श्रीकांत भगवान दिघोळकर हे त्यांची पत्नी सुनिता व मुलगा तेजस यांच्या समवेत पुण्याकडे मुलाला मुलगी पाहण्यसाठी आपल्या अल्टो कर एम.एच.१६ ए.बी.६५३ ने  चालले होते.यांच्या कारला चालक म्हणून सुमित कमलसिंग ठाकूर याला घेतले होते व सकाळी  शिरूर जवळ पुणे-नगर बाह्य  मार्गावर गंगा पेट्रोल पंपा जवळ आले असता अचानक पुण्यावरून नगरकडे जाणाऱ्या ट्रक एम.एच.१२ डी.जी ९४४४ ने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या दुभाजक मधून वळण घेतले.

या वेळी ट्रक ने वळण घेतल्याने अल्टो कार चालकाने गाडीला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो फोल ठरला.व अल्टो कार पुढील ट्रक वर जोरात आदळली.या अपघातात अल्टो कार मधील चालकास सह चार जन जखमी झाले त्यात उपचारा दरम्यान श्रीकांत भगवान दिघोळकर वय ५६ रा.भूतकर वाडी,अहमदनगर यांचा  मृत्यू झाला.या अपघात प्रकरणी अल्टो कार चालक सुमित कमल सिंग ठाकूर यांनी ट्रक चालका विरुद्ध फिर्याद दिली आहे.या अपघाताचा पुढील तपास पोलीस नाईक पी.एन.मोरे हे करत आहे.

स्कॉर्पिओ उलटुन मुलाचा मृत्यु
शिरूर बाह्य मार्गावर पहाटे साडेचारच्या सुमारास रस्त्याच्या कडेला स्कोर्पिओ गाडी धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला.तर दोघे जखमी झाल्याची घटना घडली.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानखुर्द मुंबई येथील संभाजी मोहन शितोळे हे त्यांचा मुलगा दिनेश व विनोद यांच्या समवेत त्यांच्या मूळ गावी वरपगाव तालुका-केज जिल्हा-बीड येथे ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी गेले होते.ते मतदानाचा कार्यक्रम उरकून रात्री नऊ च्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाण्यास निघाले होते.दरम्यान पहाटे साडेचारच्या सुमारास शिरूर जवळ आले असता बाह्य  मार्गावर अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी पत्रा व दगड याला  स्कोर्पिओ गाडी धडकल्याने गाडीने पलट्या खाल्या.

या वेळी वाहनातील दिनेश हा गाडीतून बाहेर फेकला गेला.व इतर दोघे जन गाडीत अडकले या वेळी पाठीमागून येणाऱ्या इतर वाहन चालकांनी अपघात झाल्याचे पाहून तत्काळ मदत केली व रुग्णवाहिकेस फोन केला.या नंतर अपघातातील जखमींना उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.यातील दिनेश संभाजी शितोळे वय ३५ राहणार मानखुर्द मुंबई याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.तर दोन जन जखमी झाले आहे.या प्रकरणी संभाजी मोहन शितोळे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक फौजदार ए.ए. शिंदे हे करत आहे.

रविवार ठरला अपघातवार

रविवार तसा शांततेचा दिवस परंतु आज पहाटे साडे चारच्या सुमारास अपघातात एका कुटुंबातील मुलाचा मृत्यू झाला तर याच महामार्गावर या अपघातानंतर काही तासांतच पुन्हा अल्टो कार ला अपघात होऊण मुलाला मुलगी पाहण्यासाठी चाललेल्या कुटुंबातील वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने रविवार हा अपघातवार ठरला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या