शिरुर तालुक्यात राज्यमहामार्गावर तीन महिन्यांत २२ बळी

शिरुर,ता.११ सप्टेंबर २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यातील केवळ राज्यमहार्गावर गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३१गंभीर स्वरुपाचे अपघात झाल्याची नोंद झाली असुन या अपघातांनी सुमारे २२ बळी गेले आहेत. यावरुन पुणे नगर राज्यमहामार्ग हा मृत्युचा सापळा ठरत चालला असल्याचे दिसून येते.

 
शिरुर पोलीस स्टेशन गेल्या तीन दिवसांत तीन गंभीर स्वरुपाचे अपघात घडले असुन तीन बळींची नोंद झाली.तर चौथा अपघात झाला परंतु त्यात सुदैवाने कोणतीही जिवितहाणी झाली नाही.याच पार्श्वभुमीवर या महामार्गांवर गेल्या तीन महिन्यांत झालेल्या अपघातांची माहिती घेतली असता अनेक गंभीर आकडेवारी समोर आली आहे.यात शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत राज्य महामार्गावर एकुण ७ अपघात झाले असुन तीन बळी तर पाच गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत ११ अपघात झाले असुन या मध्ये ३ मयत व ६ गंभीर जखमी झाले आहेत.शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या तीन महिन्यांत सर्वाधिक १३ अपघात झाले असुन यामध्ये १६ जणांचा बळी गेला आहे तर ६ गंभीर जखमी झाल्याची नोंद केली गेली आहे.या आकडेवारीवरुन तालुक्यात जर तीन महिन्यांत इतके अपघात घडत असतील तर वर्षभरात किती अपघातात बळी जात असतील याची गणती न केलेलीच बरी.

राज्यमहामार्गावर घेतलेल्या अपघातांच्या आकडेवारीवरुन बळींची संख्या अन झालेले अपघात यांची आकडेवारी मोठी असुन अत्यंत चिंताजनक अशीच आहे.या महामार्गावरील अपघातांचा विचार केला असता बहुतांश अपघात हे वेगाच्या मर्यादा पाळल्या न गेल्याने झालेले दिसुन येते.त्याचप्रमाणे बहुतांश ठिकाणी रस्त्यावर योग्य उपाययोजना केल्या नसल्याने देखिल अपघात घडत असल्याचे दिसुन येते आहे.शिरुर तालुक्यात कोरेगाव भिमा ते शिरुर पर्यंत रस्त्यांच्या लगत असलेल्या बहुतांश हॉटेल, पेट्रोलपंप चालकांनी बेकायदेशीर पणे दुभाजक तोडल्याने अपघात घडत असुन या बेकायदेशीर दुभाजक तोडणा-यांवर कारवाई हि संबंधित विभागाने करावी.

महामार्गावर होणा-या अपघातांचे कारण दारुचे सेवन हेही आहेच.त्याचबरोबर राञीची पुरेशी वाहनचालकांना झोप मिळाली नसल्यानेही अपघात होताहेत.जुलै महिन्यात न्हावरे फाटा येथे अपघातात मामा-भाची चा मृत्यु झाल्यानंतर संकेतस्थळाने स्वत: या  गंभीर बाबी महामार्गाच्या प्रमुख अधिका-यांशी भेटुन निदर्शनास आणुन दिल्या होत्या.व किरकोळ उपाययोजना करुन अपघातांवर आळा बसेल अशा सुचना निवेदनाद्वारा केल्या होत्या. परंतु आजतागायत या महामार्गावर किरकोळ उपाययोजना माञ केल्या गेल्या नाहीत.त्यामुळे महामार्गावरील अपघातांची मालिका खंडित झाली नसुन रोज कुठे ना कुठे अपघात घडतच असुन त्याची प्रचिती गेल्या तीन दिवसांत शिरुरकरांनी अनुभवली आहे.या आकडेवारीची दखल शिरुर तालुक्यातील पोलीस व अन्य प्रशासनाने घेणे गरजेचे असुन यावर तत्काळ उपाययोजना केल्या तरच यावर आळा बसु शकतो.

अपघात होउच नये म्हणुन तुम्ही काय कराल ?
  • राञीचा प्रवास शक्यतो टाळा.
  • प्रवास करताना वेगमर्यादा पाळा
  • वाहतुक नियमांचे पालन करा
  • पुरेशी झोप नसेल तर वाहन चालविणे टाळा.
  • दुचाकी चालवत असाल तर हेलमेट परिधान करुनच प्रवास करा
  • वाहन चालविताना व्यसने टाळाच
  • वाहन चालविताना मोबाइल वापरणे टाळाच.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या