'ती' हि अर्णवीची आत्याच होती पण झाली फसगत...

शिरुर, ता. १७ अॉक्टोबर २०१७ (सतीश केदारी) : शाळेतून घरी येत असताना बसमधून मी तुझी आत्या आहे,  म्हणून बसच्या काळजीवाहू मावशीकडे अर्णवीची मागणी करणारी 'ती' महिला अर्णवीची आत्याच होती. परंतु, नामसाधर्म्यामुळे झाली फसगत.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरीष श्रीकृष्ण मिरजकर (वय 45, रा. डायमंड प्लाझा, शिरूर) यांची सात वर्षांची मुलगी शाळेच्या बस स्टॉपवरून बस मधून घरी येत होती. यावेळी रंगाने काळी सावळी, अंगाने सडपातळ, तपकिरी रंगाचा कुर्ता व पांढऱ्या रंगाची लेगीज घातलेल्या एका अनोळखी महिलेने (वय अंदाजे 30 ते 35) गाडीवरील मावशी आरती कदम यांना मुलीची आत्या असल्याचे सांगून बसमधील काळजीवाहू मावशीकडे मुलीला ताब्यात देण्याची मागणी केली होती. परंतु, बसमधील मावशींनी मुलीला नकार देत थेट मुलीला घरी पालकांच्या ताब्यात सोडले. या प्रकारानंतर मिरजकर यांनी शिरुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

या गुन्ह्याचा तपास करत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी अधिक याबाबत माहिती देताना सांगितले कि, ज्या शाळेत अर्णवी मिरजकर शिकत आहे त्याच शाळेत रणजित बबन शेलार (रा.गंगाफेज, बाबूराव नगर, शिरुर) यांची कन्या अर्णवी हि सुद्धा शिकत आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी ते त्यांच्या आई व ह बहिणीला घेउन घरी चालले होते. शेलार हे फळे घ्यायला थांबले होते. त्यावेळी शाळेची बस आलेली होती. या वेळी त्यांच्या बहिणीने मी अर्णवीची आत्या आहे असे सांगितले अन् वडील बाजूला थांबलेले आहेत असेही सांगितले होते. परंतु, अर्णवी ज्या बसने घरी चालली होती, ती बस माञ दुसरी होती. या बसमधील अर्णवी हि दुसरीच अर्णवी होती. या नामसाधर्म्यामुळेच अन् दुस-याच बसमुळे पालकांची मोठी फसगत झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या