करडेकरांचे जलसंधारण समितीने केले कौतुक

करडे, ता. २७ अॉक्टोबर २०१७ (तेजस फडके) : महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सन 2015/16 मध्ये करडे (ता. शिरुर) गावची निवड केली होती.गुरुवार (दि २६) रोजी महाराष्ट्र जलसंधारण समितीतील अधिकाऱ्यांनी गावात झालेल्या जलसंधरणाच्या कामाची आणि साठवण तलाव,पाझर तलावाच्या कामाची पहाणी केली तसेच ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला. करडे व परिसरात झालेल्या दमदार पावसाने ओढे , पाझर तलाव , शिरपुर पॅटर्नचे बंधारे पुर्णपणे तुडुंब भरले.पावसाचा थेंब अन् थेंब अडवला पाहिजे.या उद्देशाने करडे ग्रामपंचायतीने उन्हाळ्यामध्ये ओढाखोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात पुर्ण केली होती. या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे परिसरातील ओढे व तलाव दुथडी भरून वाहू लागले आहेत.

जलयुक्त शिवार सारख्या कागदांवर राहिलेल्या योजनांमुळे ओढा खोलीकरणाची कामे करण्याबाबत करडे गाव व वस्त्यावरील शेतकरी प्रथमत: उदासीन होते म्हणूनच ओढा खोलीकरणाचे फायदे व महत्व शेतकऱ्यांना पटवून देत हि कामे राबवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. उन्हाळ्यात केलेल्या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

यावेळी समितीत राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोशेफ,एच बि. बोर्हाडे, दिलीप  महाले विभाग प्रमुख मृद व जलसंधारण,शंशाक देशपांडे,निवृत्त संचालक व भुजल सर्वेक्षण विजय बोराडे व समितीतील अधिकारी वर्ग आणि प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे ,शिरूरचे तहसिलदार रणजित भोसले भोसले ,गटविकास अधिकारी संदीप जठार जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, करडेच्या सरपंच रूपाली वाळके, उपसरपंच गणेश रोडे,ग्रामसेवक राहुल बांदल,कृषी अधिकारी, कृषी सेवक सात्रस साहेब, संजय जगदाळे, आप्पा वाळके, सुधिर जगदाळे , बाळासाहेब बांदल, बाळासाहेब वाळके व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी वर्ग आणि कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या